Maharashtra Cabinet Meeting | ठाकरे सरकारनं मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ 6 महत्वाचे निर्णय, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Cabinet Meeting | राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज (बुधवारी) (Maharashtra Cabinet Meeting) पार पडली. या बैठकीत महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi government) महत्वाचे निर्णय घेतले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली ही महत्वाची बैठक पार पडली आहे.

 

आज 8 डिसेंबर 2021 रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत (Maharashtra Cabinet Meeting) काही महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. या बैठकीत महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूर, मुला-मुलीचं वसतिगृह तसेच अन्य नवीन निवासी इमारती बांधण्यासाठी 95.15 कोटी रुपये मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर केले गेले आहे.

 

काय आहेत महत्वाचे निर्णय?

1 – (उच्च व तंत्र शिक्षण विभाग) – नागपूर येथील राष्ट्रीय विधि विद्यापीठासाठी वारंगा (ता.जि.नागपूर) येथे विद्यार्थी वसतिगृह आणि इतर निवासी इमारती बांधकामासाठी निधी.

 

2 – (उच्च व तंत्र शिक्षण विभाग) – कोविड 19 पार्श्वभूमीवर स्वंय अर्थसहाय्यित विद्यापीठ स्थापन करण्यासाठी इरादा पत्राचा कालावधी वाढवणार.

 

3 – (कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग) – महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास महामंडळ व महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषद या संस्थांचे विलीनीकरण करून महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ निर्माण करण्याचा निर्णय.

 

4 – (महसूल विभाग) – महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958 मधील कलम- 2 (g) (iv)
आणि सदर नि अधिनियमाच्या अनुसूची 1 च्या अनुच्छेद 25 (da) मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय.

 

5 – (पणन विभाग) – बाजार समित्या मजबूत करण्यासाठी
महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनियमन अधिनियम 1963 मध्ये सुधारणा.

 

6 – (उच्च व तंत्र शिक्षण विभाग) – शासकीय न्यायसहाय्यक विज्ञान संस्थांमधून पदवी
आणि पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळांमध्ये इंटर्नशिप

 

Web Title :- Maharashtra Cabinet Meeting | Maharashtra Thackeray Government cabinet meeting passed 7 important decisions taken presence cm uddhav thackeray and deputy cm ajit pawar today

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PMSBY | पंतप्रधान सुरक्षा विमा योजना ! एक रुपयाची छोटी गुंतवणूक तुम्हाला देऊ शकते 2 लाखापर्यंतचा मोठा फायदा, जाणून घ्या कसे?

Army Helicopter Crash | सीडीएस बिपीन रावत यांना घेवुन जाणारे हेलिकॉप्टर क्रॅश, पत्नी ‘मधुलिका’ यांच्यासह 9 जण करत होते प्रवास; 4 जणांचे मृतदेह आढळले (व्हिडीओ)

Army Helicopter Crash | तमिळनाडूमधील कुन्नूरमध्ये लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं ! हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस बिपीन रावत पत्नीसह इतर 9 जण असल्याची माहिती; दोघांचा मृत्यू (व्हिडीओ)