काँग्रेसचे नेते कॅबिनेट मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना ‘कोरोना’

पोलिसनामा ऑनलाईन – कॅबिनेट मंत्री आणि काँग्रेस नेते अस्लम शेख यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईचे पालकमंत्रीदेखील असणारे अस्लम शेख यांनी ट्विट करत संसर्ग झाला असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी कोरोनाची लक्षणे जाणवत नसून विलगीकरण केले असल्याची माहिती दिली आहे. त्याशिवाय संपर्कात आलेल्या सर्वांना चाचणी करण्याची विनंती केली आहे.

 

अस्लम शेख यांनी ट्विटमध्ये , मला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. माझ्यामध्ये सध्या कोणती लक्षणे नसून, स्वत:चे विलगीकरण केले आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना मी चाचणी कऱण्याची विनंती करतो. मी घरातून काम करत राज्यातील लोकांची सेवा करण्याचे काम सुरु ठेवणार आहे. असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान, काल राज्यात तब्बल 9 हजार 518 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली . त्यामुळे एकूण संख्या आता 3 लाख 10 हजार 455 इतकी झाली आहे. राज्यात सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 28 हजार 730 इतकी आहे.