अखेर ठरलं ! मंत्रिमंडळ विस्तार ‘या’ तारखेला, 18 मंत्र्यांचा होणार शपथविधी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन महाविकास आघाडी सरकारचे खातेवाटप काही दिवसांपूर्वीच झाले असताना आता मंत्रिमंडळाचा पुढील विस्तार नागपुरचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर होणार असल्याचे सांगितले जात आहे. २३ अथवा २४ डिसेंबरला हा मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो. गृहखाते शिवसेनेकडेच राहणार असल्याचे समजते. मुंबईत होणाऱ्या या शपथविधी कार्यक्रमात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील प्रत्येकी सहा मंत्री गोपनियतेची शपथ घेणार आहेत.

या नावांची शक्यता
१ शिवसेना
गुलाबराव पाटील, सुनील प्रभू, अनिल परब, रवींद्र वायकर, डॉ. सुजित मिणचेकर, उदय सामंत, दीपक केसरकर.

२ राष्ट्रवादी काँग्रेस
अजित पवार, दिलीप वळसे पाटील, नवाब मलिक, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, दीपिका चव्हाण, अनिल देशमुख, सतीश चव्हाण.

३ काँग्रेस
पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, अमीन पटेल, बंटी पाटील, यशोमती ठाकूर, सुनील केदार.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/