राज्य मंत्रीमंडळानं मराठा आरक्षणाविषयी घेतला मोठा निर्णय, विद्यार्थ्यांना दिलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडी सरकारची मंत्रिमंडळ बैठक आज (बुधवार, २३ डिसेंबर) पार पडली. या बैठकीत मराठा विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. SEBC उमेदवारांना यापुढे आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातून (EWS) शैक्षणिक प्रवेश घेता येणार आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने मोठा पेच निर्माण झाला होता. अशातच मराठ्यांना EWS मधून आरक्षण देऊ नये, त्याने न्यायालयीन सुनावणीवर परिणाम होईल, अशी भूमिका काही मराठा संघटनांनी घेतली होती. मात्र, आता सरकारने घेतलेल्या या निर्णयावर संमिश्र अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतले गेलेले ७ मोठे निर्णय

गृह/राज्य उत्पादन शुल्क विभाग
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या टाळेबंदीदरम्यान राज्यातील परवानाधारक (अनुज्ञप्ती) मद्यविक्रीची दुकाने बंद होती. या बंद दुकानांच्या परवाना (अनुज्ञप्ती) शुल्कात सूट देण्याची मागणी करण्यात आली होती. त्याप्रमाणे या परवानाधारक मद्यविक्रेत्यांना हे शुल्क भरण्यास सूट देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता

अन्न, पुरवठा व ग्रा. संरक्षण विभाग
लक्ष्यनिर्थारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा तसेच यंत्रणेचे बळकटीकरण करुन अन्नधान्याची वाहतूक शिधावाटप दुकानांपर्यंत थेट करण्यासाठी धोरण निश्चित करण्यास मान्यता.

अन्न, पुरवठा व ग्रा.संरक्षण विभाग
पोषणतत्व गुणसंवर्धीत तांदूळ (Fortified Rice) वितरणाची केंद्र सहाय्यित योजना संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर राबविण्यास मंजुरी देण्यात आली. कुपोषणाचे (एनिमिया) प्रमाण कमी करण्यासाठीची ही योजना राज्याच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत राबविण्यात येणार.

कौशल्य विकास व उद्योजकता विभाग
राज्यातील ५३ शासकीय तंत्र माध्यमिक शाळा/केंद्र तथा कनिष्ठ महाविद्यालयातील २ स्तरावरील उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमांचे (HSC Vocational) शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये शिल्प कारागिर प्रशिक्षण योजनेतंर्गत व्यवसाय अभ्यासक्रमामध्ये रुपांतर करण्यास मान्यता .

पशुसंवर्धन, दुग्ध विकास विभाग
राष्ट्रीय सहकार विकास निगम पुरस्कृत योजनेतील कुक्कुट पालन सहकारी संस्थांची थकबाकी प्रथम एक मुस्त करार (वन टाईम सेटलमेंट) पध्दतीने भरण्यास मंत्रिमंडळाची मान्यता.

शालेय शिक्षण विभाग
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करणार

सार्वजनिक बांधकाम विभाग
महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरांचे जतन व संवर्धन करणार