वाशिम : मंत्र्याच्या स्वागतासाठी जमलेल्या गर्दीप्रकरणी 10 हजार लोकांवर केस, मंत्र्याचे नाव नसल्याने प्रश्न उपस्थित

मुंबई : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात सातत्याने कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लोकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी म्हटले की, जर लोकांनी नियमांचे पालन केले नाही तर पुन्हा लॉकडाऊन लागू शकतो. कोरोनाबाबत उद्धव ठाकरे सक्ती करत असतानाच त्यांचेच मंत्री शक्तीप्रदर्शनाच्या नावावर त्यांचे आवाहन धुडकावत आहेत.

पुण्यातील टिकटॉक गर्लच्या आत्महत्या केसमध्ये अडकलेले मंत्री संजय राठोड सुमारे पंधरा दिवसानंतर वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी मंदिरात पोहचले तेव्हा त्यांनी हजारो समर्थकांना जमवले होते. संजय राठोड यांच्या स्वागतासाठी जमल्याने 10 हजार लोकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, मात्र, यामध्ये मंत्र्याचे नााव नसल्याने उद्धव ठाकरे सरकारवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

उद्धव ठाकरे सरकार तसेच संजय राठोड यांच्यावर भाजपाकडून सुद्धा आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या प्रकरणी आवाज उठवला जात आहे. सूत्रांनुसार, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी नाराज असलेल्या शरद पवारांनी हे प्रकरण सरकार आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेसाठी नुकसानकारक असल्याचे म्हटले आहे, जे उद्धव ठाकरे यांच्यासाठी चिंतेची बाब आहे. तर या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाशिम जिल्ह्याचे कलेक्टर आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडून रिपोर्ट मागितला आहे. वक्तव्यानुसार, ठाकरे यांनी या गोष्टीवर जोर दिला की, कोविड-19 महामारीसंबंधी नियम सर्वांसाठी समान आहेत. त्यांनी वाशिमचे कलेक्टर आणि पोलीस प्रमुखांना मंदिरराजवळ जमलेल्या गर्दीसंबंधी रिपोर्ट मागितला आहे.

23 वर्षांच्या तरूणीच्या मृत्यूचा राठोड यांच्याशी संबंध असल्याचा आरोप आठ फेब्रुवारीला पुण्याच्या हडपसरमध्ये एका इमारतामधून पडल्याने 23 वर्षांच्या तरूणीचा मृत्यू झाला होता. सोशल मीडियावर काही पोस्टमध्ये आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने आरोप केला होता की, या तरूणीच्या मृत्यूचा राठोड यांच्याशी संबंध आहे.