मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तोडले 44 वर्षांचे हे रेकॉर्ड, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे एका रेकॉर्डची नोंद झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे असे दुसरे मुख्यमंत्री आहेत ज्यांना पाच वर्षांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण करता आला आहे. या आधीच्या मुख्यमंत्र्यांच्या यादीतील फक्त वसंतराव नाईक यांना आपल्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ पूर्ण करता आला होता.

आतापर्यंत राज्यात काँग्रेसचीच सत्ता होती. या काळात झालेल्या मुख्यमंत्र्यांना एकतर स्वतःच्या चुकांमुळे मुख्यमंत्रीपद सोडावे लागले किंवा केंद्रातून निमंत्रण आल्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा त्याग करावा लागला.

देवेंद्र फडणवीस यांनी जर पुन्हा मुख्यमंत्री पदाची पुन्हा शपथ घेतली तर ते थेट वसंराव नाईक यांची बरोबरी करतील. या आधी यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांना केंद्रात जाण्यासाठी मुख्यमंत्रीपद सोडावे लागले होते.

देवेंद्र फडणवीस यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ
बीजेपीने मराठा समाजाचा मुख्यमंत्री न करता ब्राह्मण समाजाचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात दिला. त्यानंतर महाराष्ट्रात अनेक उलथापालथ झाली. मराठा समाजाचे मोर्चे आरक्षणासाठी निघाले, कोरेगाव भीमा येथे दंगल झाली, धनगर आणि मुस्लिम समाजाने आरक्षणासाठी आंदोलने केली अशा अनेक संकटांमुळे मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले, मात्र देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक गोष्टीचे उत्तर शोधत आपली खुर्ची वाचवली आणि आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला.

या मुख्यमंत्र्यांना सोडावे लागले होते मुख्यमंत्री पद
मुंबईत झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटामुळे १९९३ रोजी सुधाकर नाईक यांना मुख्यमंत्री पद सोडावे लागले होते. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मतभेद झाल्यामुळे मनोहर जोशी यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले होते. २००८ साली पुन्हा मुंबईवरील हल्ल्यामुळे विलासराव देशमुख यांना तर आदर्श सोसायटी घोटाळ्यावरून अशोक चव्हाण यांना काँग्रेसने मुख्यमंत्री पदावरून हटवले होते.

सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली पाच वर्षाची कारकीर्द पूर्ण झाल्यामुळे एक रेकॉर्डच केला आहे. सध्या मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेद्वारे आगामी विधानसभेसाठी तयारी करत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like