पुन्हा लॉकडाऊनची वेळ येऊ नये, यासाठी काळजी घ्या ! CM ठाकरे यांचे राज्यातील जनतेला आवाहन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दिवाळीनंतर देशात आणि महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (chief-minister-uddhav-thackeray) यांनी राज्यातील जनतेशी रविवारी (दि. 22) रात्री संवाद साधला. लशीवर अवलंबून न राहता, कोरोनाला रोखण्यासाठी काय आणि कशी काळजी घ्यावी, तो आपुलकीचा सल्ला त्यांनी दिला आहे.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी जनतेला संबोधित केले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज नेमकं काय बोलणार ? कुठला नवीन निर्णय जाहीर करणार ? याबद्दल विविध तर्क-विर्तक लढवले जात होते. पण त्यांनी कुठलाही मोठा निर्णय जाहीर केला नाही. उलट पुन्हा लॉकडाऊनची वेळ येऊ नये, यासाठी काळजी घेण्याचे आवाहन केले.

जनतेला संबोधित करताना काय म्हणाले मुख्यमंत्री ठाकरे
* मी सांगितल्याप्रमाणे पाडव्याला सर्व धर्मांची प्रार्थना स्थळी उघडली.
* कार्तिकी यात्रेला गर्दी करु नका.
* सर्व सण संयमाने साजरे केले.
* सगळ उघडले म्हणजे करोना गेला असे समजू नका.
* दिल्लीत दुसरी, तिसरी लाट आली आहे. परदेशात लॉकडाऊन केला आहे.
* गर्दी वाढली तरी करोना मरणार नाही, वाढणार आहे.
* ज्येष्ठ नागरिकांसाठी करोना जास्त घातक आहे. तरुणांपासून वुद्धांना या आजाराची लागण होऊ शकते. त्यामुळे सर्वांनीच काळजी घ्यावी.
* लशीकरणाबाबत अजून सर्व अंधातरी आहे.
* २४ ते २५ कोटी जनतेला लशीकरण करायची गरज आहे.
* लस मिळाल्यानंतर ती किती तापमानात ठेवायची हे अजूनही निश्चित झालेले नाही
* जनतेची जबाबदारी माझ्यावर आहे. हे उघडा, ते उघडा सांगणाऱ्यांवर ती जबाबदारी नाही, असे सांगत त्यांनी विरोधकांना टोल लगावला.
* अनावश्यक घराबाहेर पडू नका, करोनाची लक्षण दिसली तर लगेच चाचणी करा, ही मी कळकळीची विनंती करतो.
* लस येईल तेव्हा येईल, करोनापासून जेवढ शक्य होईल तेवढ लांब राहा.
*गर्दी टाळा, अनावश्यक ठिकाणी टाळा, मास्क लावण विसरु नका, हात धुवत रहा, योग्य अंतर पाळा हेच करोना टाळण्याचे उपाय आहे असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.