Maharashtra Cinema Hall Reopen | राज्यातील सिनेमा हॉल, थिएटर्स 22 ऑक्टोबरपासून सुरु होणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन| राज्यात कोरोनाची दुसरी लाट (corona second wave) आल्यानंतर राज्यातील सर्व थिएटर्स बंद करण्यात आले होते. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारकडून (Maharashtra Government) निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात येत आहेत. त्यानुसार राज्यातील थिएटर्स आता पुन्हा सुरु (Maharashtra Cinema Hall Reopen) होणार आहेत. 22 ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळून राज्यातील थिएटर्स पुन्हा खुली (Maharashtra Cinema Hall Reopen) करण्यास परवानगी देण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी घोषित केले आहे.

यासंदर्भात सविस्तर कार्य पद्धती एसओपी (SOP for theaters reopen) तयार करण्याचे काम सुरु असून ती लवकरच जाहीर करण्यात येईल.
आज टास्क फोर्स (Task Force) सदस्य खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut), मुख्य सचिव सीताराम कुंटे (Chief Secretary Sitaram Kunte),
अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ. प्रदीप व्यास (Dr. Pradeep Vyas) तसेच निर्माते रोहित शेट्टी (producers Rohit Shetty), कुणाल कपूर, मकरंद देशपांडे
(Makrand Deshpande), सुबोध भावे (Subodh Bhave), आदेश बांदेकर (Adesh Bandekar) व नाट्य क्षेत्रातील मान्यवरांशी मुख्यमंत्र्यांनी बैठकीत चर्चा केली.

येत्या 5 नोव्हेंबर रोजी जागतिक मराठी रंगभूमी दिन (World Marathi Theater Day) साजरा केला जात आहे.
अनलॉक नंतर अनेक कलाकारांनी नाट्यगृह पुन्हा सुरु करण्याची मागणी केली होती.
परंतु, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे शक्यता धुसर होती.
पण, आता राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता सुद्धा कमी झाली आहे.
त्यामुळे 5 नोव्हेंबरला नाट्यगृह सुरु केले जाणार आहेत.

Web Title : Maharashtra Cinema Hall Theaters Reopen | maharashtra cinema hall theaters my reopen from october 22

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | अनैतिक संबंधातून 17 वर्षाच्या मुलीने दिला मुलाला जन्म; 20 वर्षीय बाप आला ‘गोत्यात’

Pune Police | महिला पोलीस अंमलदारांसाठी आनंदाची बातमी ! सोमवारपासून 8 तास ड्युटीची अंमलबजावणी

DGP Sanjay Pandey | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग, 4 डीसीपी, काही एसीपींसह 25 पोलिस अधिकारी ‘गोत्यात’, निलंबनाच्या हालचालींना वेग; जाणून घ्या प्रकरण