संपूर्ण महाराष्ट्रात बंदचा परिणाम; एसटी बसस्थानकांवर शुकशुकाट : शाळा, महाविद्यालये बंद

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला संपूर्ण प्रतिसाद मिळाला असून राज्यात सर्वत्र प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी सकाळपासून रस्ता रोखण्याचा प्रयत्न करण्यात आले असून एस टी स्थानके, बसस्थानके, रेल्वे स्थानकांवर शुकशुकाट दिसून येत आहे. राज्यातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. वाशी तसेच दादरमधील भाजी व फुल मार्केट पूर्णपणे बंद आहे. नेहमी गर्दीने भरून वाहणारे सीएमएसटी रेल्वे स्थानकावर आज सकाळपासून शुकशुकाट पहायला मिळत आहे. मध्य रेल्वेवर नेहमीपेक्षा आज कमी गर्दी असून बहुसंख्यांनी घरीच थांबणे पसंत केले आहे. राज्यातील एस टी वाहतूकीवर मोठा परिणाम झाला असून अनेक शहरातील बस वाहतूकही बंद ठेवण्यात आली आहे.
[amazon_link asins=’B075ZZ79KB’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’edc35467-9b8f-11e8-83d5-9384fb56b12a’]
या आंदोलनाची सुरुवात मध्यरात्री कोल्हापूर येथून होताना दिसून आली. कोल्हापूर -पुणे बंगलोर महामार्गावरील पंचगंगा नदीच्या पुलावर मराठा आंदोलकांनी मध्यरात्री पावणेदोन वाजता ठिय्या आंदोलनास सुरुवात केली. हे समजताच पोलिसांनी तेथे धाव घेत त्यांना ताब्यात घेतले़ शेवगाव- गेवराई महामार्गावर बालमटाकळी येथे चौकाचौकात टायर पेटवले. लातूर-बार्शी-पुणे रस्ता मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रोखला आहे.
[amazon_link asins=’B0769Y59TR’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c8e6137b-9b8f-11e8-b16f-b398adc22170′]
पुणे जिल्ह्यातील ७ तालुक्यांमधील इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे. पंढरपुरमध्ये आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. नवी मुंबईला बंदमधून वगळण्यात आले असले तरी वाशी येथील एपीएमसी मार्केट बंद ठेवण्यात आले आहे.
हिंजवडीतील आयटी कंपन्यांवर बंदचा परिणाम बंदचा परिणाम हिंजवडीतील आयटी कंपन्यावर जाणवतोय. बहुतांश कंपन्या बंद आहेत तर काही कंपन्यांनी ‘वर्क फॉर होम’चा पर्याय अवलंबला आहे. ज्यांना आॅफिसला येणं गरजेचं होतं त्यांनी नऊच्या आधीच आॅफिस गाठलं आहे. हिंजवडीत एकूण १२० छोट्या-मोठ्या कंपन्या असून इथे साडे तीन लाख कर्मचारी काम करतात.
[amazon_link asins=’B00KNOW2SQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f90393f1-9b8f-11e8-b9bd-a7cd5913e31e’]
सोलापुरात मराठा आंदोलकांनी माढा-शेटफळ मार्गावर चक्काजाम आंदोलन केले आहे. बाभळीची झाडे आणि टायर पेटवून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. मोटरसायकल रॅली काढून आंदोलनाला सुरुवात केली होती.