24 जानेवारीला महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट : प्रकाश आंबेडकर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. 24 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली असून या पार्श्वभूमीवरच ही भेट झाल्याचे समजते आहे. मुख्यमंत्र्याच्या भेटीनंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी यासंदर्भात माहिती दिली.

दरम्यान, जसं याआधी दादर टीटीचं आंदोलन शांततेत झालं, त्याच शांततेत हे आंदोलन पार पडलं पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. आम्हीसुद्धा त्यांच्या शब्दाचा मान राखत हे आंदोलनही शांततेत करणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितले.

24 जानेवारीला शांततेत बंद होणार असून अनेक बँकांच्या संघटनांनी यात सहभागी होणार असल्याचं कबूल केलं आहे. या संघटनांसोबतच एसटी कर्मचारीदेखील सहभागी होतील. आर्थिक झळ फार मोठ्या प्रमाणात बसली असून, त्याची कोठेही वाच्यता केली जात नाही. ज्याप्रमाणे एनआरसी आणि सीएएची केली जाते. हा कायदा लागू केल्यास 40 टक्के हिंदू बाधित होतील, त्यांच्या नावाची यादी जाहीर करणार आहोत. हिंदूंमधीलच काही जातींसंदर्भात आम्ही ही माहिती देणार आहोत. मुस्लिम लोक जागरूक झालेले आहेत, असंही ते म्हणाले आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/