#Chowkidar मोदींच्या चौकीदारीला महाराष्ट्रातही मोठा प्रतिसाद

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर हँडलवर स्वतःचे नाव चौकीदार देवेंद्र फडणवीस असे केले आहे. नरेंद्र मोदी यांनी चौकीदार चोर है या काँग्रेसच्या दमननीतीला रोखण्यासाठी ‘मै भी चोकीदार हू’ ची मोहीम उघडली आहे. त्या मोहिमे अंतर्गत नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या ट्विटर हँडलवर स्वतःचे नाव चौकीदार नरेंद्र मोदी असे नाव केले आहे. त्यानंतर संपूर्ण देशभर भाजप नेत्यांनी आपल्या ट्विटरवरील नावापुढे चौकीदार हा शब्द जोडला आहे.

राफेल कराराच्या वादळी संघर्षात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी चौकीदार चोर है असे गंभीर वक्तव्य केले. त्यानंतर प्रत्येक शहरात राहुल गांधी यांच्या सभेत काँग्रेस कार्यकर्त्ये चौकीदार चोर है चे नारे देऊ लागले. या सर्व पार्श्वभूमीवर चौकीदार चोर हे या मुद्द्यातील हवा काढून घेण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर हँडलवर आपले नाव चौकीदार नरेंद्र मोदी असे केले. त्यानंतर संपूर्ण देशातील भाजपचे नेते आपल्या नावापुढे चौकीदार असा शब्द लिहू लागले आहेत.

लोकसभेच्या प्रचाराच्या समाप्तीपर्यंत हि ट्विटरवरील चौकीदारी सुरु राहण्याची शक्यता आहे. में भी चौकीदार हू या मोहिमे अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी ३१ मार्चला देशभरातील कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. चौकीदार चोर हे असे म्हणणाऱ्या काँग्रेसला भाजपने में भी चौकीदार हू म्हणत चांगलाच शह देण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्य प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आदी भाजप नेत्यांनी आपल्या नावापुढे चौकीदार हा शब्द जोडला आहे.