मिसेस CM अमृता फडणवीस म्हणतात, ‘त्याचा काहीच फरक पडत नाही’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील किंवा नसतील काही फरक पडत नाही. ते माणूस म्हणून कसे आहेत हे महत्वाचे आहे. असे मिसेस मुख्यमंत्री म्हणजेच अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे. पुण्यामध्ये उषा संजय काकडे यांच्या संस्थेतर्फे विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अमृता फडणवीस बोलत होत्या.

मुख्यमंत्र्याची पत्नी असल्याचे जसे फायदे आहेत तसे तोटे देखील आहेत. टीकेचे दगड माझ्यावर मारले जातात. त्यातील काही दगड हे constructive (रचनात्मक) तर काही दगड हे desteuctive(नकारात्मक) असतात. त्याकडे लक्ष न दिलेलेच बरे असे परखडपणे त्यांनी यावेळी सांगितले. या कार्य़क्रमामध्ये गौरी शहरूख खान ही देखील सहभागी झाल्या होत्या. त्यांची मुलाखत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी घेतली.

‘मिसेस सीएम’चा ‘रॉकस्टार’ अवतार व ‘ग्लॅमरस’ लुक

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी नुकताच लॉस एन्जेलिस आणि कॅलिफोर्नियातील म्युझिकल कॉन्सर्टमध्ये सहभाग नोंदवला. अमेरिकन असोसिएशन ऑफ फिजिशिअन्स ऑफ इंडियन ओरिजिन यांनी जय हो चॅरिटी म्युझिकल कॉन्सर्टचं आयोजन केलं होतं. अमृता फडणवीस यांनी शोमधील त्यांचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. सध्या हे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. नेटकऱ्यांनी अमृता फडणवीस यांच्या या उपक्रमाचे कौतुकही केले आहे. त्यांचे हे फोटो हजारो लोकांनी लाईक केले आहेत तर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.

लक्ष केंद्रित का होत नाही ? जाणून घ्या यामागील कारणे

अशा प्रकारेदेखील खावू शकता भाज्या, होतील अनेक फायदे

‘या’ कारणामुळे पावसाळ्यात ‘डोळ्यांच्या समस्या’ निर्माण होतात

महाआघाडीच्या अडचणीत वाढ,वंचितनंतर ‘हा’ पक्षही देणार धक्का ?

धक्कादायक : महाविद्यालयीन विद्यार्थिनीला बसमधून उतरविण्याचा प्रयत्न