Maharashtra CM Eknath Shinde | मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची ती धमकी खोटी, हॉटेल मालकाला त्रास देण्यासाठी तरूणाचा प्लॅन, पोलिसांनी घेतले ताब्यात

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Maharashtra CM Eknath Shinde) यांना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्यासाठी कट रचला जात असल्याची माहितीही गुप्तचर विभागाला (Intelligence Department) मिळाली आहे. ही माहिती मिळाल्यानंतर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत, असे वृत्त काल प्रसिद्ध झाले होते. मात्र, ही धमकी (Threat) खोटी असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. एका तरूणाचा दारूच्या नशेत हॉटेल मालकाशी वाद झाल्यानंतर त्याने हॉटेल मालकाला अद्दल घडवण्यासाठी पोलिसांच्या 100 नंबरवर फोन करून खोटी माहिती दिली, आणि सर्व यंत्रणा कामाला लागली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या (Maharashtra CM Eknath Shinde) सुरक्षा व्यवस्थेवर गृहखात्याचे लक्ष असल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे.

लोणावळा पोलिसांनी (Lonavala Police) याप्रकरणी पिंपरी-चिंचवडमधील नाशिक फाटा परिसरातून 36 वर्षीय अविनाश अप्पा वाघमारेला (Avinash Appa Waghmare) ताब्यात घेतले आहे. वाघमारे मूळचा घाटकोपर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकरनगरमधील साठे चाळीतील रहिवासी आहे. त्याने हा धमकीचा फोन केला होता.

वाघमारे दारूच्या नशेत असताना त्याचे लोणावळ्यातील एका हॉटेलमध्ये पाण्याच्या बाटलीवरुन हॉटेल मालकाशी भांडण झाले होते.
या भांडणावनंतर हॉटेल मालकाला त्रास देण्यासाठी वाघमारेने महाराष्ट्र पोलिसांच्या (Maharashtra Police)
100 या आपत्कालीन क्रमांकावर फोन करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Maharashtra CM Eknath Shinde)
यांना मारण्यासाठी कट रचला जात असल्याची खोटी माहिती दिली.

याप्रकरणी अविनाश वाघमारेविरोधात पोलीस यंत्रणा आणि हॉटेल चालकाला त्रास दिल्याबद्दल कलम 177 अंतर्गत
लोणावळा पोलीस स्थानकामध्ये (Lonavala Police Station) अदखलपात्र गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

Web Title :- Maharashtra CM Eknath Shinde | home minister devenedra fadanvis commented on life threat to cm eknath shinde

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde | अपक्ष आमदारांनी साथ सोडली तरी 55 पैकी 40 आमदार आमच्यासोबत : एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केली आपली ताकद

Maharashtra Police | पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना शिंदे सरकारकडून ‘दसऱ्या’ची भेट, नैमित्तिक रजेत भरघोस वाढ; जीआर निघाला