कुटूंबऱ्हास टळला ! पवार कुटूंबातील ‘फूट’ रोखण्यात ‘या’ व्यक्तींनी बजावली महत्वाची ‘भूमिका’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अजित पवारांना राष्ट्रवादीशी फारकत घेऊन भाजपला पाठिंबा देत सत्तास्थापनेत सहभाग घेतला. त्यानंतर पवार कुटूंबाला मोठा बसला. अजित पवारांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीत गट पडतात की काय अशी शक्यता निर्माण झाली होती. परंतू शरद पवारांनी सर्व सूत्र आपल्या हातात घेऊन अजित पवारांची ही बंडाळी मोडून काढली. या दरम्यान अजित पवारांची मनधरणी करण्याचे पक्षातील नेत्यांसह कुटूंबातील नातेवाईकांनी देखील बरेच प्रयत्न केले गेले.

अजित पवारांनी तर उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर बहुमत चाचणीत कसोटीला उतरता येणार नाही यामुळे सावध पवित्रा घेत देवेंद्र फडणवीस यांनी 2 दिवसांत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. या दरम्यान अजित पवारांना परत फिरवण्यासाठी बरेच प्रयत्न झाले. सुप्रिया सुळे यांना देखील अजित पवारांना परत येण्याचे आवाहन केले. कुटूंबात फूट पडल्याने सुप्रिया सुळे भावूक झाल्या होत्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू आल्याचे देखील पाहायला मिळाले.

अजित पवारांची नाराजी दूर करण्याचे अनेक नेत्यांनी प्रयत्न केले. याशिवाय कुटूंबातून देखील प्रयत्न करण्यात आले. यात शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार आणि सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे यांनी महत्वाची भूमिका बजावली. प्रतिभा पवारांवर अजित पवारांचे विशेष प्रेम असल्याचे सांगण्यात येते, सदानंद सुळे यांच्या माध्यमातून प्रतिभा पवार आणि अजित पवारांची भेट झाल्याचे सांगण्यात येते. राजकीय घडामोडींदरम्यान प्रतिभा पवारांनी कुटूंब सांभाळण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या शब्दाला मान देऊन अजित पवारांनी राजीनामा दिल्याचे सांगण्यात येते.

राष्ट्रवादीची भूमिका शिवसेनेसोबत जाण्याविषयी स्पष्ट नव्हती. त्यामुळे काँग्रेसला देखील राष्ट्रवादीविषयी संदिग्धता होती. मधल्या काळात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत योग्य संवाद साधला जात नव्हता. त्यानंतर प्रतिभा पवार यांनी हस्तक्षेप करुन राज्याच्या राजकारणाला वेगळी दिशा दिली.

शरद पवारांनी या घटनेदरम्यान आपल्या नेत्यांच्या मनातील अस्वस्थता ओळखी होती. ते देखील यानंतर साशंक होते. दरम्यान उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी शरद पवारांची भेट घेतली. तेव्हा प्रतिभा काकींनी शरद पवारांची जुनी आठवण करुन दिली, जेव्हा सुप्रिया सुळे पहिल्यांदा निवडणूकीच्या उभ्या होत्या तेव्हा भाजपने त्यांच्या विरोधात उमेदवार देण्याची तयारी सुरु होती. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी शरद पवारांना फोन लावून सांगितले की आपली मुलगी निवडणूक लढवत आहे, तिच्या विरोधात कोणीही उमेदवार देणार नाही, ती बिनविरोध निवडून येईल. असे स्पष्ट करत सुप्रिया सुळेंच्या पाठिशी आपण ठामपणे उभे आहोत असे सांगितले होते.

तेव्हा बाळासाहेब आपल्या मुलीच्या पाठिशी उभे होते, आज बाळासाहेबांचा मुलगा एकटा पडला आहे. त्यांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे. कोणत्याही प्रकराचे राजकारण न आणता आपण त्यांना मदत केली पाहिजे असा आग्रह प्रतिभा काकींनी केला. त्यानंतर शरद पवारांनी पूर्णपणे शिवसेनेसोबत पुढची राजकीय आखणी सुरु केली.

Visit : Policenama.com