महाशपथविधी ! उद्धव ठाकरेंसह काँग्रेस – राष्ट्रवादीचे ‘हे’ 2 – 2 नेते घेणार मंत्रिपदाची ‘शपथ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आज राज्यात महाविकासआघाडी बऱ्याच काळाच्या घडामोडीनंतर सत्तास्थापन करणार आहे. आज संध्याकाळी 6 च्या सुमारास शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शिवतीर्थावर शपथ ग्रहण करतील. या दरम्यान आणखी कोण आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार याबाबत अस्पष्ट होती परंतू आता वृत्त आहे की राष्ट्रवादीचे दोन आणि काँग्रेसचे दोन नेते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

त्यात राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आणि जयंत पाटील हे नेते आहेत तर काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांच्या गळ्यात आज मंत्रिपदाची माळ पडू शकते अशी जोरदार चर्चा आहे. 3 तारखेनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येईल असे देखील वृत्त आहे. तर अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद मिळू शकते असे देखील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

महाविकासआघाडीचा फॉर्म्युला देखील ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार काँग्रेसला 13 मंत्रिपद. यातील 9 कॅबिनेट तर 4 राज्यमंत्रिपद असतील. तर शिवसेनेला 11 कॅबिनेट मंत्रिपद आणि 4 राज्यमंत्रिपद वाट्याला येतील. परंतू गृह आणि महसूल खात्यावर अजूनही काँग्रेस आणि राष्ट्रवादीत चर्चा सुरु आहे.

शिवसेनेला मुख्यमंत्रिपद दिल्याने राष्ट्रवादीला गृहमंत्रिपद मिळणार अशी शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसला महसूल खातं देण्याचे ठरलं आहे. राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपद मिळणार असेही सांगितले जात आहे. परंतू या पदावर जयंत पाटील की अजित पवार बसणार यावर संभ्रम आहे. काँग्रेसने उपमुख्यमंत्रिपदाला नकार देत विधानसभा अध्यक्ष पदाची मागणी केली आहे.

याशिवाय शिवसेनेला 8 आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसला क्रमश 9 – 9 मंत्रिपद मिळणार आहेत. काँग्रेसकडून अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, के. सी. पाडवी, विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर, सतेज बंटी पाटील, सुनील केदार यांनी मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे तर शिवसेनेकडून मंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे, दिवाकर रावते, सुभाष देसाई, अब्दुल सत्तार, रामदास कदम, तानाजी सावंत, दीपक केसरकर, गुलाबराव पाटील चर्चेत आहेत. तसेच राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप पाटील, मकरंद पाटील आणि राजेश टोपे, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख यांना मंत्रिपद मिळू शकते.

Visit : Policenama.com