नवरात्र आणि दसरा साधेपणाने साजरा करा : मुख्यमंत्री

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्र, दूर्गापूजा, विजयादशमी साधेपणाने साजरी करा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. नागरिकांनी सणामध्ये देखील सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. जेणेकरुन कोरोनाचा प्रसार थांबवता येईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

शासनाने गणपती उत्सव साजरा करण्याबाबत जसे परिपत्रक काढले होते. त्याचप्रमाणे संबंधित सणाबाबत लवकरच मार्गदर्शक परिपत्रक काढण्यात येणार आहे. येत्या 17 ते 25 ऑक्टोबरदरम्यान नवरात्र, दूर्गापूजा, विजयादशमी सण साजरा होणार आहेत. लोकांनी गर्दी न करता गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सवही साधेपणाने साजरा करावा. कोरोनासंदर्भातील शासनाने जारी केलेल्या सूचना, मार्गदर्शन, दक्षता यांचे पालन करावे. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन, स्वच्छता या सर्व बाबींची काळजी घ्यावी, जेणेकरुन आपण सर्वजण सर्वांच्या सहभागातून कोरोनाचा प्रसार रोखू शकतो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.