Video : ‘सरकार कोसळेल असे म्हणणाऱ्यांचे दात पडत आले’, वर्षपूर्तीनिमित्त CM ठाकरेंच्या मुलाखतीचा ‘प्रोमो’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील महाविकास आघाडी सरकारला सत्तेवर येऊन एक वर्ष पूर्ण होत आहे. वर्षपूर्तीनिमित्त (On the occasion of the anniversary of the government) शिवसेना खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray ) यांची मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत शुक्रवारी (दि. 27) प्रसारित होणार आहे. या मुलाखतीचा प्रोमो खा. राऊत यांनी शेअर केला आहे. प्रोमोत खा. राऊत हे मुख्यमंत्री ठाकरेंना राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार आपल्याच ओझ्याने पडेल, अशी भाकित अनेक ज्योतिषांनी वर्तवली आहेत? असा प्रश्न विचारताना दिसतात. यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या शैलीत सरकार पडेल असे म्हणणाऱ्यांचे दात पडत आले, असे उत्तर दिले आहे. सुडानेच वागायचे असेल तर मग तुम्ही एक सूड काढा आम्ही दहा सूड काढतो, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिल्याचे या प्रोमोमध्ये दिसून येत आहे.

सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त खा. राऊतांनी मुख्यमंत्र्यांच्या घेतलेल्या मुलाखतीची पहिली झलक चांगलीच व्हायरल होत आहे. यात पूर्णपणे, उघडपणे आणि निर्लज्जपणे महाराष्ट्रात हे अघोरी प्रयोग सुरू झाले असे राऊत यांनी विचारले आहे. यावर मुख्यमंत्री ठाकरे उत्तर देताना म्हणतात की, आमच्या अंगावर येणारे काही धुतले तांदूळ नाहीत. तुमची खिचडी कशी शिजवायची ते आम्ही शिजवू शकतो.

या प्रोमोत खा. राऊत मुख्यमंत्री ठाकरेंना महाराष्ट्र आत्मनिर्भर कधी होणार? राज्यात कोण कोणाचा सूड घेतोय? मुख्यमंत्री हात धुवा पलीकडे काय सांगणार? असे सवाल करताना दिसत आहेत. या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणतात की, ठीक आहे, हात धूत आहे. पण जास्त अंगावर आले तर हात धुऊन मागे लागले. विकृत बुद्धीचे चाळे तुम्ही करू नका. विकृती ही विकृती असते. जेव्हा आव्हान मिळते तेव्हा मला अधिक स्फूर्ती येते. कितीही आडवे आले तरी त्यांना आडवं करून महाराष्ट्र पुढे जाईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी प्रोमोमध्ये दिला आहे. दि. 28 नोव्हेंबर 2019 रोजी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली होती. त्यानिमित्त मुख्यमंत्री ठाकरे यांची मुलाखत पाहण्यास मिळणार आहे.