उध्दव ठाकरे यांचा इशारा – ‘माझं सरकार पाडायचं तर पाडा, मग पाहतो’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : राजस्थानमध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगा दरम्यान एका मुलाखतीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्याला कोणाला माझे सरकार पाडायचे आहे, त्यांनी पाडून दाखवावे, मी आता पाहून घेतो. त्यांनी म्हंटले कि, कोणाची वाट पाहताय ? आता सरकार पाडा, सरकार तीन चाकी असले, तरी ते गरिबांचे वाहन आहे. पण स्टेरिंग माझ्या हातात आहे. जर मला बुलेट ट्रेन किंवा रिक्षा निवडायची असेल तर मी रिक्षा निवडेल. मी गरिबांच्या पाठीशी उभा आहे. मी माझी ही भूमिका बदलत नाही. मी मुख्यमंत्री बनलोय याचा अर्थ असा समजू नये कि, मी बुलेट ट्रेनच्या मागे उभा राहीन. शिवसेनेचे मुखपत्र सामनाशी बोलताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ढासळली आहे, पण मार्ग काढू.

महाराष्ट्रात ऑपरेशन कमळ यशस्वी होईल की नाही? या प्रश्नाला उत्तर देताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणाले की, करून बघा ना, मी भविष्यवाणी कशी करू ? आपण करून बघा. जोड-तोड करून बघा. एक महत्वपूर्ण मुद्दा काय आहे, असा कोणताही विरोधी पक्ष नेता दाखवा, जो दुसर्‍या पक्षात गेल्यानंतर सर्वोच्च पदावर पोहोचला आहे, मुख्यमंत्री बनला आहे ? तुमच्या पक्षात तुम्हाला असे काय मिळत नाही, ज्यासाठी तुम्हाला दुसऱ्या पक्षात जावे लागते. बर्‍याच ठिकाणी अशी उदाहरणे आहेत. अशी ‘तोडफोड’ होते, त्यामागे ‘वापर आणि फेकून द्या’ धोरण अवलंबिले जाते.

त्याचवेळी तीन चाकी सरकारच्या आरोपावर मुख्यमंत्री म्हणाले की, सरकार तीन चाकी आहे, परंतु ते गरिबांचे वाहन आहे. मुख्यमंत्री असल्याकारणाने मी सर्वांगीण विकास करीन. लोक माझ्या पाठीशी आहेत म्हणूनच मी बुलेट ट्रेन घेऊन येईल, असे नाही. जोपर्यंत सर्वजण सहमत नाहीत. मग तीन चाकी तर तीन चाकी एका दिशेने जातेय ना. मग आपल्या पोटात दुखायचे काय कारण ?

सीएम उद्धव यांनी प्रश्न विचारला की, केंद्रात किती चाके आहेत? हे आमचे तीन पक्षांचे सरकार आहे. केंद्रात किती पक्ष सरकारमध्ये आहेत, नाही का? गेल्या वेळी मी एनडीएच्या बैठकीला गेलो होतो, तेथे 30-55 चाके होती. म्हणजे ती एक ट्रेन होती.