मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा ‘त्या’ कारणावरून देवेंद्र फडणवीसांवर ‘निशाणा’, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपदावरून भाजप व शिवसेनेत तणाव निर्माण झाला होता. भाजपने दिलेल्या शब्दाला जागावे यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठाम होते. तर आम्ही असा शब्दच दिला नाही, अशी भूमिका भाजपने घेतली होती. त्यामुळे बहुमत असूनही युतीची सत्ता स्थापन न होता काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेने मिळून सरकार बनवले.

सत्तास्थापन झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच गेल्या महिन्याभरातील राज्यातील सत्तानाट्यावर भाष्य करताना विविध खुलासे केले होते. तसेच शिवसेना काँग्रेससोबत कशी गेली हे आश्चर्यजनक आहे असे विधान केले होते. काही गोष्टी उजेडात आलेल्या नाहीत. त्या योग्य वेळी बाहेर आणणार आहे असंही फडणवीस म्हणाले होते. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाष्य केले आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या दाव्यांवर प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘माजी मुख्यमंत्री असल्याने त्यांच्याकडे माझी बरीच माहिती असेल. त्यांना काय बोलायचं आहे ते बोलू द्या.’

काय म्हणाले होते फडणवीस –
शपथविधीच्या आधी 2 दिवस अजित पवारांबरोबर चर्चा झाली होती. आम्ही राष्ट्रवादीकडे गेलोच नव्हतो. तर अजितदादाच आमच्याकडे आले होते. 23 नोव्हेंबरला जो शपथविधी झाला त्याआधी अजित पवार यांनी आमच्याकडे येऊन सांगितले की, काँग्रेस आणि शिवसेनेसोबत मिळून तीन पक्षाचे सरकार जास्त काळ टिकणे शक्य नाही आणि राज्याला स्थिर सरकार देण्याची गरज आहे. ते सरकार फक्त भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यास देता येऊ शकते कारण त्यांच्याकडील आमदारांचा आकडा मोठा आहे. त्यांनी आमदारांच्या सह्यांचं पत्रही आणलं होतं. तसेच माझं काही आमदारांशी बोलणंही करून दिलं. आम्ही त्यांच्याबरोबर जायला हवं की नको यावर वाद होऊ शकतात, पण त्या वेळी तो गनिमी काव्याचा डाव होता.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं मिळून सरकार स्थापन होणार यावर शिक्कामोर्तब झालं असतानाच अचानक नाट्यमय घडामोडी घडून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली. देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र अजित पवार यांनी माघार घेतल्याने देवेंद्र फडणवीस यांना बहुमताच्या परीक्षेला सामोरे जाण्याआधीच राजीनामा द्यावा लागला.

Visit : Policenama.com

उसाचा रस पिताना घ्या काळजी, ‘या’ ७ गोष्टी लक्षात ठेवा
‘माऊथवॉश’ वापरत असाल तर वेळीच व्हा सावध ! ‘हे’ आहेत ३ धोके
‘ही’ आहेत अस्थमा आजाराची १० कारणे, जाणून घ्या याची ५ लक्षणे
‘ही’ फॅशन महिलांना पडू शकते महागात ! होऊ शकतात ‘या’ ५ समस्या
‘थंड दूध’ पिण्याने वाढते सौंदर्य ! ‘हे’ ५ फायदे तुम्हाला माहित आहेत का ?
प्रोटीन्सचा खजिना आहे ‘डाळ-भात’ ! रोज खाल्ल्यास होतील ‘हे’ ५ फायदे
बटाट्याच्या रसाचे हे ६ आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल थक्क ! जाणून घ्या
मानसिक स्वास्थ चांगले राहण्यासाठी खा ‘डार्क चॉकलेट’, हे आहेत ९ फायदे
अर्धशिशीच्या समस्येची ‘ही’ आहेत ९ कारणे, अशी घ्या काळजी, करा हा उपाय
तु ‘चीज’ बडी है मस्त-मस्त ! हाडे होतील मजबूत, हे आहेत ५ आरोग्यदायी फायदे