मातोश्री-2 बांधून रेडी ! ठाकरे कुटुंबाचं 8 मजली नवं घर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे नेमके कोठे राहणार याबाबत चर्चा सुरू असतानाच त्यांच्या मातोश्री-2 या इमारतीचीही चर्चा सुरू झाली आहे. वांद्रेमधील कलानगरमध्ये असणाऱ्या मातोश्री इमारतीजवळच ही मातोश्री-2 इमारत उभारण्यात आलेली आहे.
Matoshree 2
अशी आहे मातोश्री-2 ची इमारत
मातोश्रीजवळ रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला नवी मातोश्री-2 ची ही आठ मजली इमारत बांधून पूर्ण झाली आहे. मातोश्री-2 ही इमारत एकूण 10 हजार स्‍क्‍वेअर फूट क्षेत्रात बांधण्यात आली आहे. ही जागा 2016 मध्ये 11 कोटी 60 लाख रुपयांना खरेदी करण्यात आली आहे.या इमारतीत 5 बेडरुम, स्टडी रुम, होम थिएटर, स्विमिंग पूल, हायटेक जिम आणि भव्य हॉल आहे. तसेच आठ मजली इमारत असून त्यामध्ये 3 ड्युप्लेक्स फ्लॅट आणि दोन प्रवेशद्वार असल्याची माहिती मिळत आहे. मातोश्री-2 चे एक प्रवेशद्वार कलानगरच्या दिशेने तर दुसरे बीकेसीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दिशेला असेल.

सध्या ठाकरे कुटुंब मातोश्रीतच वास्तव्याला आहे. लवकरच ठाकरे कुटुंब या नव्या इमारतीत राहण्यासाठी जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Visit : Policenama.com