‘ही राजकीय बैठक नव्हती’ ! मुख्यमंत्र्यांचे ‘शरीफ’ उत्तर, लगावला ठाकरी टोला (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासोबत व्यक्तीगत भेट (personal meeting) झाली नाही. ही काही राजकीय भेट नव्हती. पण माझे त्यांच्यासोबत चांगले संबंध आहेत. मी काय नवाझ शरीफ (Nawaz Sharif) यांना भेटायला गेलो नव्हतो, असे ठाकरे स्टाईल उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
या भेटीमध्ये अनेक मुद्यांवर चर्चा झाली. महत्त्वाचे म्हणजे मराठा आरक्षणावर (Maratha reservation) ही भेट घेण्यात आली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीनंतर महाराष्ट्र सदन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्रींनी बैठकीमधील माहिती दिली.

तर त्यात चुकीचं काय ?

तुमची पंतप्रधान मोदींसोबत वैयक्तीक भेट (personal meeting) झाली का ? यावर बोलताना ठाकरे म्हणाले, मी ही गोष्ट कधी लपवत नाही आणि लपवण्याची गरज नाही.
आज आम्ही राजकीयदृष्ट्या एकत्र नाही, परंतु याचा अर्थ आमच्यातील नातं तुटलं असा नाही.
एका मुलाखतीत हे सांगितले होते.
त्यामुळे भेटलो तर त्यात काही चुकीचं नाही.
मी काही नवाज शरीफला भेटायला गेलो नव्हतो.
माझ्या सहकाऱ्यांना मी पुन्हा जाऊन त्यांना भेटायचं आहे.
असे सांगितलं तर त्यात चुकीचं काय ? अशा उलट सवाल त्यांनी केला.

आजची आमची वैयक्तिक भेट

मध्यंतरीच्या काळात त्यांचा मला फोन आला होता.
त्यावेळी त्यांनी सरकार चांगलं काम करत असल्याचे सांगितलं. हे व्यक्तीगत बोलणं होतं.
आजही आमची वैयक्तिक भेट झाली यावेळी त्यांनी विचारपूस केली.
मी त्यांना सहकाऱ्यांसोबत आलो असून राज्याचे प्रश्न आहेत असे सांगितले, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.
युती का तुटली ? असं विचारलं असता दीड वर्षांनी त्यावर उत्तर का द्यावं, असे ठाकरे म्हणाले.

Aditya Thackeray | मुंबईत लोकल सेवा पुन्हा केव्हा सुरू होणार? मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले…

Web Title :  maharashtra cm uddhav thackeray over personal meeting with pm narendra modi