‘सिक्सर किंग’ युवराजनं दिल्या CM उद्धव ठाकरेंना शुभेच्छा, मुख्यमंत्र्यांनी दिला हटके ‘रिप्लाय’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजप आणि शिवसनेची युती तुटल्यानंतर राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांनी एकत्र येत महाविकासआघाडी स्थापन केली आणि राज्यात महाविकासआघाडीचं सरकार स्थापन केलं. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर राज्याला त्यांच्या रुपानं नवीन मुख्यमंत्री मिळाला. सर्व स्तरातून उद्धव ठकारे आणि सरकारचं कौतुक होताना दिसत आहे. अशातच आता टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगनंही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर ट्विटरवरून त्यांचं अभिनंदन केलं आहे.

युवराजनं केलेलं ट्विट पाहिल्यानंतर उद्धव ठाकरेंनीही त्याच्या या शुभेच्छांचा स्विकार केला आहे आणि क्रिकेटर युवीचे आभार मानले आहेत. ट्विटरवरून युवराजच्या ट्विटला उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आहे.

युवीबद्दल सांगायचं झालं तर, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर युवराज सिंग सध्या जगभरातील टी 20 लीगमध्ये खेळताना दिसत आहे. आगामी आयपीएलसाठी युवी मुंबई इंडियन्सकडून करारमुक्त झाला आहे. त्यामुळे आगामी हंगामात कोणता संघ त्याच्यावर बोली लावतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Loading...
You might also like