… म्हणून अजित पवार यांना राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचा जाहीर पाठिंबा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या बोलावण्यावरून राजभवनवर गेलेले काही आमदार काही तासांतच शरद पवार यांच्याकडे परत आले आहेत. ‘कुठलीही कल्पना न देता आम्हाला राजभवनवर बोलावण्यात आलं होतं. मात्र, आम्ही पक्षाच्या सोबत आहोत,’ असं या आमदारांनी स्पष्ट केलं. तर त्यापैकी काही आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा दर्शवला आहे.

अजित पवार यांना पाठिंबा देणारे राष्ट्रवादीचे अमळनेरचे आमदार अनिल पाटील म्हणाले की, ‘ काँग्रेसने एक महिन्यापासून घोळ चालवला होता दररोज एक अपेक्षा वाढत होती नवनवीन पद मागत होते म्हणून सकाळी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला.’

भाजपचा प्रयत्न यशस्वी होणार नाही-
‘फाटाफुटीचं हे राजकारण मी खूप पाहिलंय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून सरकार स्थापनेचा भाजपचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. त्यांना बहुमत सिद्ध करता येणार नाही. 30 नोव्हेंबरला पुढचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस हे तिन्ही पक्ष पुन्हा एकदा सरकार स्थापनेसाठी प्रयत्न करतील,’ असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.

Visit : Policenama.com