राष्ट्रवादीला मोठा धक्‍का ! सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी शरद पवार, अजित पवारांवर ED कडून गुन्हा दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन : विधानसभा निवडणूकीचे बिगूल वाजलेले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जबरदस्त धक्‍का बसला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळयाप्रकरणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह इतर राजकीय नेत्यांवर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. नियमबाह्य कर्ज वाटप केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. मात्र, विधानसभा निवडणूकीपुर्वीच ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आल्याने तर्कवितर्क काढले जात आहेत.

ईडीनं गुन्हा दाखल केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, यापुर्वी उच्च न्यायालयाने घोटाळयाप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशाला आव्हान देत अनेकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र, सुप्रीम कोर्टानं त्यांची याचिका फेटाळून लावली होती. तेव्हापासूनच शरद पवार यांच्यावर देखील ईडीकडून गुन्हा दाखल केला जाऊ शकतो अशी चर्चा होती. अखेर आज ईडीनं शरद पवार यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केल्याचे वृत्‍त समोर आले आहे. शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचे वृत्‍त समोर आल्यानंतर राज्यभर खळबळ उडाली आहे. शरद पवार, अजित पवारांसह सर्वपक्षीय नेत्यांवर हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.