Maharashtra Co-operation Department | सहकार विभागाचा मोठा निर्णय ! सोसायटीची नोंदणी करतानाच कन्व्हेयन्सची पुर्तता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Co-operation Department | सोसायटीची नोंदणी (Housing Societies) करतानाच कन्व्हेयन्ससाठीची (Convenience- अभिहस्तांतरण) सर्व अत्यावश्यक कागदपत्रे (Documents) सादर करावीत, असा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याच्या सहकार विभागाकडून (Maharashtra Co-operation Department) घेण्यात आला आहे. कन्व्हेयन्स, डीम्ड कन्व्हेयन्सची प्रक्रिया अतिशय सोपी करण्यात आली आहे.

 

राज्याच्या सहकार विभागाच्या (Maharashtra Co-operation Department) या निर्णयामु‌ळे सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांना कन्व्हेयन्स (अभिहस्तांतरण) करताना होणारा त्रास कायमचा थांबणार आहे. त्याचबरोबर राज्यातील सुमारे निम्म्याहून जादा गृहनिर्माण सोसायट्यांच्या नावावर जमीन नाही. ही बाब भविष्यात सभासदांसाठी अडचणीची ठरणार आहे. तसेच, सोसायट्यांनी कन्व्हेयन्स अथवा डिम्ड कन्व्हेयन्स करून घ्यावं असं आवाहन सहकार आयुक्त अनिल कवडे (Co-operation Commissioner Anil Kawade) यांनी केलं आहे. त्याबाबतच्या सूचना उपनिबंधकांना (Deputy Registrar) दिल्या गेल्या आहेत.

 

दरम्यान, बांधकाम व्यावसायिक सोसायटी नोंदवून सोसायटीचा कारभार सदनिकाधारकांकडे सोपवितात. सोसायटी नोंदविल्यानंतर आगामी 4 महिन्यात कन्व्हेयन्स करून देणे गरजेचे असते. पण, कन्व्हेयन्स करून देण्यास बांधकाम व्यावसायिकांकडून टाळाटाळ केली जातेय. सद्यस्थितीत बांधकाम व्यावसायिक कन्व्हेयन्स करून देत नसल्याने अनेक सोसायट्यांनी ‘डीम्ड कन्व्हेअन्स’चे अर्ज उपनिबंधकांकडे सादर केले आहेत. त्यासाठी अत्यावश्यक असलेली कागदपत्रे गोळा करताना सदनिकाधारकांची कसरत होतेय. तर आताच्या निर्णयामुळे बांधकाम व्यावसायिक हे सोसायटी नोंदविण्यासाठी उपनिबंधक कार्यालयात आल्यानंतर त्यांच्याकडून सर्व कागदपत्रे घेतली जाणार आहेत.

 

Web Title :- Maharashtra Co-operation Department | housing societies rule change make land in the name of housing societies by builder

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा