Maharashtra Cold Wave | राज्यातील थंडी कधी होणार कमी ? जाणून घ्या IMD चा अंदाज

0
168
Maharashtra Cold Wave imd predicts rainfall cold wave and winter for next 24 hours in up delhi mp punjab rajasthan maharashtra
file photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Maharashtra Cold Wave | राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका (Maharashtra Cold Wave) सुटला आहे. राज्यातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका देखील पिकांना पडला. यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे. एकीकडे अवकाळी पाऊस (Rain) आणि दुसरीकडे थंडी (Cold Wave) यामुळे गारठा वाढला आहे. अनेक जिल्ह्यात तापमानात घट झाली असल्याने थंडीची लाट उसळली आहे. दरम्यान आता शनिवारनंतर उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतातील थंडीची लाट हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे, तर उत्तर-पश्चिम, पूर्व आणि ईशान्य भारतात 2 ते 4 फेब्रुवारी दरम्यान पावसाची शक्यता आहे. अशी माहिती भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) दिली आहे.

 

आगामी 24 तासामध्ये उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतातील बहुतांश ठिकाणी किमान तापमानात कोणताही लक्षणीय बदल होणार नाही
आणि त्यानंतर हळूहळू 4 ते 6 अंश सेल्सिअसची वाढ होईल.
अशी शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे.
दरम्यान, वायव्य आणि मध्य भारतातील बहुतांश भागात 2 फेब्रुवारीपर्यंत कमाल तापमान 3 ते 5 अंश सेल्सिअसने वाढण्याची आणि त्यानंतर घसरण्याची शक्यता आहे.
आगामी 4 दिवसांत पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये 15 ते 25 किमी प्रतितास वेगाने वाऱ्याची शक्यता असणार आहे. (Maharashtra Cold Wave)

दरम्यान, तीन दिवसांत पूर्व भारतात किमान तापमानात कोणताही लक्षणीय बदल होण्याची शक्यता नाही आणि त्यानंतर ते 2 ते 4 अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल.
तर, आगामी 24 तासांत पंजाब, हरियाणा-चंदीगड, पश्चिम उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या वेगळ्या भागात थंडी कायम असेल.
मात्र, त्यानंतर थंडीची लाट कमी होईल. असं हवामान विभागाने (Indian Meteorological Department) सांगितलं आहे.

 

Web Title :- Maharashtra Cold Wave | imd predicts rainfall cold wave and winter for next 24 hours in up delhi mp punjab rajasthan maharashtra

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा