Maharashtra Cold Weather | राज्यात पुढील 3-4 दिवस कडाक्याची थंडी

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Cold Weather | राज्यातील तापमानात घट झाली असून सर्वत्र कमालीची थंडी जाणवू लागली आहे. या हंगामातील सर्वांत निच्चांकी तापमानाची नोंद नाशिकमध्ये आज सकाळी ६.६ अंश सेल्सिअस इतकी झाली आहे. दरम्यान आगामी तीन ते चार दिवस राज्यात कडाक्याची थंडी जाणवणार असल्याचे हवामान विभागाने अंदाज (IMD) वर्तवला आहे. (Maharashtra Cold Weather)

 

नाशिक, मनमाड, मालेगावसह ग्रामीण भागात थंडीसोबत धुक्याची लाट पसरल्याचं चित्र आहे. निफाडमध्ये ५.५, मनमाड १० तर मालेगावात ९ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. जनजीवन विस्कळीत झालं असून द्राक्ष बागांना हवामानाचा सर्वाधिक फटका बसला असल्याने शेतकरी चिंतेत आहे. राज्याच्या काही भागात दोन दिवस अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. त्यामुळेच तापमानात मोठी घसरण झाली. याचा परिणाम प्रकर्षणाने मुंबईत जाणवला. शहरातल्या अनेक भागात किमान तापमान १६ अंशांवर पोहोचलं. येत्या एक ते दोन दिवसांत मुंबईत थंडीचा प्रभाव असणार असल्याचं हवामान तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

 

नाशिक, मुंबई बरोबरच राज्यातील अनेक भागात कमाल तापमानात मोठी घसरण झाली आहे. नंदुरबारमधील पारा पुन्हा घसरला असून सपाटी भागात तापमान ७ ते ८ डिग्री सेल्सिअस पर्यत घसरले. सातपुडा पर्वत रागांमधील डाब भागात पुन्हा दवबिंदु गोठले असल्याने गवतांवर बर्फाच्छादीत चादर पसरल्याचं चित्र पाहायला मिळत होत. पुणे, औरंगाबादमध्येही कमाल तापमानाची नोंद २५ अंशाखाली नोंदवलं गेलं आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील तीन ते चार दिवस तापमानात घट होणार आहे.

 

Web Title :- Maharashtra Cold Weather | maharashtra cold weather temperature drops nashik mumbai

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा