Maharashtra Congress | शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसचे 5 आमदार ‘नॉट रिचेबल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेत बंडाचे वारे सुरु झाल्याने सकाळपासून राज्यातील वातावरण पुरते हादरले आहे. आता काँग्रेसच्या (Maharashtra Congress) गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेसचे पाच आमदार नॉट रिचेबल (MLA Not Reachable) झाले आहेत. सुरुवातीला विधान परिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election 2022) काँग्रेसची मते फुटली होती. त्यामुळे काँग्रेसने (Maharashtra Congress) सर्व आमदारांना मुंबईत येण्याचे बोलवणे पाठवल्याची माहिती मिळत होती. परंतु आता काँग्रेसचे पाच आमदार नॉट रिचेबल असल्याचं समोर येतंय.

 

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) समर्थक शिवसेनेचे आमदार नॉट रिचेबल असताना आता पाठोपाठ काँग्रेसचे (Maharashtra Congress) पाच आमदारही नॉट रिचेबल असल्याचं समोर येतंय. त्यामुळे राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. दरम्यान हे नॉट रिचेबल आमदार नेमके कोण आहेत हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. नॉट रिचेबल असलेल्या आमदारांची सख्या पाच असून ते कोणत्या ठिकाणी आहेत हे कोणालाच माहिती नाही, त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही.

 

विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग (Cross Voting) झाल्याचे समोर आले.
त्यांच्या उमेदवाराला पहिल्या पसंतीची मतंही आली नाहीत.
त्यातच शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकवले.
याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या आमदारांना मुंबईत बोलावले होतं. यामध्ये पाच आमदार मुंबईत आले नसल्याचे समोर आलं.
या पाच आमदारांशी काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याशी संपर्क होऊ शकत नाही. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात चिंता वाढली आहे.

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी देखील आमच्याच आमदारांमध्ये नाराजी असेल तर दुसऱ्यांवर नाराज होण्याचा प्रश्न येत नाही.
काहीतरी बिघडलेय, ते आधी पहावे लागेल असे म्हटले होते.
या सर्व घडामोडींवर काँग्रेसने आमदारांना मुंबईत बोलावले आहे.
उद्या कमलनाथ (Kamalnath) यांच्या उपस्थितीत काँग्रेसची महत्त्वाची बैठक होत असून त्या बैठकीला आता हे आमदार उपस्थित राहणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Web Title :- Maharashtra Congress | after shivsena five congress mlas are not reachable maharashtra political crisis

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा