Maharashtra Congress | महाराष्ट्र काँग्रेसमध्ये फूट पडण्याच्या भीतीने सोनिया गांधी बॅकफूटवर, मोठा निर्णय बदलला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेत (Shivsena) मोठी फूट पडल्याचे ताजे असतानाच महाराष्ट्र काँग्रेसमध्ये (Maharashtra Congress) मोठी फूट पडणार असल्याच्या चर्चांना मागील काही दिवसांपासून उधाण आले आहे. यामध्ये महाराष्ट्र काँग्रसमधील (Maharashtra Congress) ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Senior Leader Ashok Chavan) यांचे नाव आघाडीवर आहे. अशोक चव्हाण भाजपमध्ये (BJP) प्रवेश करण्याची चर्चा सुरु होती. मात्र, त्यांनी आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचे स्पष्टीकरण दिलं. मात्र तरीही काँग्रेसचा मोठा गट फुटणार असल्याची चर्चा सुरु झाल्याने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Congress President Sonia Gandhi) यांनी एक पाऊल मागे घेण्याचा मोठा निर्णय घेतला.

 

महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi Govt) बहुमत चाचणीच्या (Majority Test) वेळी काँग्रेसचे (Maharashtra Congress) 11 आमदार अनुपस्थित होते. त्यामुळे या 11 आमदारांवर काँग्रेस हायकमांड (Congress High Command) कारवाई करणार असल्याची माहिती समोर आली होती. या 11 आमदारांमध्ये (MLA) अशोक चव्हाण यांचे देखील नाव होते.

 

कारवाईच्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता.
जर अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले तर त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील अनेक आमदार भाजपमध्ये जाऊ शकतात.
त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
याच भीतीमुळे काँग्रेस हायकमांडने त्या 11 आमदारांवर कारवाई न करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
महत्त्वाचं म्हणजे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे 11 आमदारांवर कारवाई
करण्याची शिफारस निरीक्षक मोहन प्रकाश (Inspector Mohan Prakash) यांनी केली होती.
मात्र, आता ही कारवाई होणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज्यात उद्धव ठाकरे सरकार (Uddhav Thackeray Government) पायउतार झाल्यानंतर शिंदे सरकार (Shinde Government) अस्तित्वात आले.
शिंदे सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावेळी काँग्रेसच्या अनेक आमदारांच्या अनुपस्थितीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी नाराजी व्यक्त केली होती.
तसेच विधान परिषदेच्या निवडणुकीत (Legislative Council Election) क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती.

 

Web Title :- Maharashtra Congress | Congress high command will not take action against 11 mls of party who not follow order of sonia gandhi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Pimpri Crime | ‘माझे लग्न तिच्याशी लावून द्या, नाहीतर मी…’, अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या रोडरोमियोवर FIR

 

Lipstick Effect | लिपस्टिक आणि अंडरवेयरची विक्री सांगते की इकॉनॉमी बिकट अवस्थेत आहे, जाणून घ्या कसे

 

Aditya Thackeray | ‘गद्दारांना काय मिळालं ‘बाबाजी का ठुल्लू’, आदित्य ठाकरेंचा बंडखोर आमदारांना टोला (व्हिडिओ)