Maharashtra Congress | काँग्रेस आमदाराच्या दाव्याने खळबळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अब्दुल सत्तारांपासून धोका!

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Congress | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना त्यांच्याच गटातील मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यापासून धोका असल्याचा खळबळजनक दावा जालन्यातील काँग्रेस (Maharashtra Congress) आमदार कैलास गोरंट्याल (MLA Kailas Gorantyal) यांनी केला आहे. काल जालन्यात आयोजित हिंदू गर्व गर्जना मेळावात बोलताना सत्तार यांनी आमदार गोरंट्याल यांच्यावर टीका केली होती. यावरून गोरंट्याल यांनी हे वक्तव्य केले आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

 

कैलास गोरंट्याल म्हणाले, अब्दुल सत्तार यांना विधानपरिषदेवर मी पाठवले. माणिकदादा पालोतकर (Manikdada Palotkar) यांनी नगराध्यक्ष, मी आमदार, अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मंत्री केले, त्यांचे ते झाले नाही. विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) आणि नारायण राणेंचे (Narayan Rane) सुद्धा ते झाले नाहीत. बिचार्‍या एकनाथ शिंदे यांचे कसे होणार? जिकडे डम-डम उधर हम, असे अब्दुल सत्तारांचे आहे. (Maharashtra Congress)

 

गोरंट्याल यांनी पुढे म्हटले की, अब्दुल सत्तार हे सत्तेतील मीठाचा खडा आहेत. एकनाथ शिंदेंना भाजपा (BJP),
शिवसेना (Shivsena) अथवा उद्धव ठाकरेंपासून नाहीतर, अब्दुल सत्तांरांपासून धोका असल्याचे दादा भुसे (Dada Bhuse) यांना मी सांगितले. अब्दुल सत्तार गद्दार असून, कोणाचेही नाही.
एवढ्या सर्व लोकांनी त्यांना आशीर्वांद दिला, त्यांचे झाले नाहीत. एकनाथ शिंदे कोण आहेत?

 

Web Title :- Maharashtra Congress | congress mla kailash gorantyal reply abdul sattar policenama marathi news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | चिठ्ठी आयी है, आयी है…भाषण सुरू असतानाच अजितदादा गुणगुणले गाणं, कार्यकर्त्यांमध्ये हास्यकल्लोळ!

Pune Crime | अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई, 5 लाखाचा भेसळयुक्त गुळ व साखर जप्त

Maratha Reservation | मराठा आरक्षणासाठी पुन्हा राज्याव्यापी आंदोलन करू, मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक, सरकारला इशारा