Maharashtra Congress | काँग्रेसनं मोठा निर्णय घेतल्यानं शिवसेनेला मोठा धक्का ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) पायउतार व्हावे लागल्यानंतर आता काँग्रेस अँक्शन (Maharashtra Congress) मोडमध्ये आली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत (Legislative Council Election) काँग्रेसच्या पहिल्या क्रमांकांच्या उमेदवाराला काही आमदारांनी मतदान (Voting) केले नाही तर विश्वासमतावेळी मुद्दाम गैरहजर राहिले. अशा आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई (Disciplinary Action on MLA) करण्यात येणार असल्याचे संकेत काँग्रेस (Maharashtra Congress) पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत.

 

गुरुवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (State President Nana Patole) यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Congress President Sonia Gandhi) यांची भेट घेऊन अहवाल सादर केला.
त्यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi), काँग्रेसचे सरचिटणीस (संघटन) के. सी. वेणुगोपाल (Congress General Secretary (Organization) K. C. Venugopal) उपस्थित होते.
विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेस (Maharashtra Congress) उमेदवार चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) पराभूत झाले होते.
पहिल्या पसंतीची मते न मिळाल्याने त्यांचा पराभव झाला.
दरम्यान, काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याची कबुली पटोले यांनी सादर केलेल्या अहवालात दिली आहे.

 

पटोले म्हणाले की, क्रॉस व्होटिंग (Cross Voting) आणि विश्वासमताच्यावेळी गैरहजर राहिलेले सात सदस्य कॉमन आहेत.
त्यामुळे त्या आमदारांच्या हेतुवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. हे सर्व पक्षश्रेष्ठींच्या निदर्शनास आणले आहे.
गैरहजर राहिलेल्या काही सदस्यांनी पक्षाची पूर्वपरवानगी घेतली होती, असेही ते म्हणाले.

 

मुंबई महापालिका स्वबळावर लढणार

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी मुंबई महानगर पालिकेची निवडणूक (Brihan Mumbai Corporation Election) काँग्रेस स्वबळावर लढवणार असल्याचा पुनरुच्चार केला.
महाराष्ट्रातील राजकीय गणिते बदलली असून काँग्रेसनेही आता रणनीती बदलण्याचे ठरवले असल्याचे पटोले यांनी सांगितले.

 

Web Title :- Maharashtra Congress | congress pushes shiv sena after mva government collapses the upcoming BMC elections will be fought on their own

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा