Maharashtra Congress | राज्यात काँग्रेसचा ‘राजस्थान पॅटर्न’? ‘हे’ मंत्री बदलण्याची शक्यता, दिल्लीत खलबतं सुरू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राजस्थानमध्ये (Rajasthan) ज्याप्रमाणे मंत्रिमंडळातील सदस्यांचे राजीनामे घेऊन नव्याने मंत्रिमंडळ तयार केले, त्याच पद्धतीने काही धक्कादायक निर्णय महाराष्ट्र काँग्रेसच्या (Maharashtra Congress) वतीने घेतले जाण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी (Winter session) हे बदल करावे, असा महाराष्ट्र काँग्रेसने (Maharashtra Congress) आग्रह धरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे (MLA Praniti Shinde) यांना मंत्रिपद देण्यावरुन चर्चा सुरु आहे. याचवेळी विधानसभेचे अध्यक्षपद (Assembly Speaker) भरण्यासाठीची चर्चा पुन्हा नव्याने सुरु झाली आहे.

 

नाना पटोले म्हणाले, मी दिल्लीत गेलो होते पण या विषयासाठी नाही, मात्र पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य होईल.
महाराष्ट्रातील काँग्रेसच्या (Maharashtra Congress) काही मंत्र्यांना दिल्लीत बोलावून पक्षश्रेष्ठी त्यांच्याशी चर्चा करत आहेत.
सगळ्यांशी चर्चा झाल्यानंतर मंत्रिमंडळातील काही सदस्यांना पक्षाची जबाबदारी दिली जाईल. तर काहींना मंत्रिपद, असे सांगण्यात येत आहे.
पटोले यांना प्रदेशाध्यक्षपद देतानाच मंत्रिपदही दिले जाईल, असा शब्द पक्ष श्रेष्ठींनी दिला होता.
त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासाठी त्यांचा आग्रह आहे.

 

यांची मंत्रीपद बदलणार?

 

तसेच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad), ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut), आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी (K.C. Padvi) यांच्यातही काही बदल केले जातील.
असे सांगितले जात आहे. विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहील, असे शिवसेना (Shivsena)आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
भोरचे आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांचे नाव अध्यक्षपदासाठी सुचविले होते. परंतु त्यावर पक्षाने निर्णय घेतला नव्हता.

 

अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत

 

पुढील आठवड्यात विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक अपेक्षित आहे, असे विधिमंडळातील अधिकाऱ्यांचे मत आहे.
अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत घेण्याचा आग्रह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी धरला आहे.
20 डिसेंबर दरम्यान एक आठवड्याचे अधिवेशन मुंबईतच पार पडेल. त्याआधीच काँग्रेसला हे बदल करुन हवे आहेत, असे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

 

Web Title : Maharashtra Congress | congresss rajasthan pattern maharashtra too nana patole MLA Praniti Shinde maharashtra cabinet reshuffle

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Life Certificate | पेन्शनर्स ‘या’ 5 पद्धतीने जमा करू शकतात लाईफ सर्टिफिकेट, शिल्लक आहेत केवळ 6 दिवस

Indian Railways | रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! प्रशासनानं सुरू केली ‘ही’ सुविधा

JanDhan Account | तुमचे सुद्धा असेल SBI मध्ये जनधन खाते तर सेव्हिंग खात्यात ‘या’ पध्दतीनं करू शकता ट्रान्सफर, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया