Maharashtra Congress | आ. रवी राणा आणि भाजपकडून शिवरायांचा अवमान, त्यांनी माफी मागावी – काँग्रेस

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Congress | महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा (Amravati Shivaji Maharaj Statue) भाजप (BJP) समर्थक अपक्ष आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी मध्यरात्री राजापेठ उड्डाणपुलावर (Rajapeth Flyover) बसवला. हा पुतळा महापालिकेने (Municipal Corporation) काल रात्री काढून टाकला. पुतळा बसवणे आणि पुतळा हटवणे हे दोन्ही प्रकार शिवरायांचा अवमान (Insult) असून यास आमदार रवी राणा आणि महापालिकेतील सत्ता असलेले भाजप संपूर्णत: जबाबदार आहे. शिवरायांच्या अवमानाबद्दल रवी राणा आणि भाजपने माफी मागावी अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेसचे (Maharashtra Congress) प्रदेश प्रवक्ते दिलीप एडतकर (Dilip Edatkar) यांनी केली आहे.

 

महापालिकेत भाजपची सत्ता असून पुतळा बसविण्यासाठी परवानगी देणे किंवा पुतळा हटवणे हे महापालिकेच्या अखत्यारीत येत असल्यामुळे पुतळा हटवण्याचे पाप भाजपचेच आहे.
या सर्व प्रकाराला भाजप जबाबदार आहे.
त्यामुळे भाजप आणि भाजप समर्थक आमदार रवी राणा यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेसने (Maharashtra Congress) केली आहे.

दिलीप एडतकर म्हणाले, मध्यरात्री शिवरायांचा पुतळा बसवणारे आमदार रवी राणा व महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपने पुतळा हटाव प्रकरणाला जबाबदार असून त्यांनी शिवरायांचा अवमान केला आहे.
अमरावती महापालिकेत भाजपची सत्ता असून महापालिकेने हा पुतळा हटवला.
असे असताना भाजपचे नगरसेवक (BJP Corporator) आणि रवी राणा हे पालकमंत्री यशोमती ठाकूर (Guardian Minister Yashomati Thakur) यांच्यावर पुतळा हटाव प्रकरणी टीका करीत आहेत.
हा अव्वल दर्जाचा निर्लज्जपणा असून महापालिकेत सत्ता असलेल्या भाजपनेच हा पुतळा हटवला.
मग पालकमंत्र्यांना दोष देणं हे हस्यास्पद असल्याचे एडतकर यांनी म्हटले.

 

आमदार रवी राणा शिवरायांच्या पुतळ्यावरुन अत्यंत खालच्या दर्जाचं राजकारण करत आहे.
विझण्याआधी दिवा जसा जास्त वेळ फडफडतो तसं रवी राणा यांचे झाले आहे.
आता कोणताही पुतळा रवी राणा यांना वाचवू शकत नाही,
असे सांगत शिवरायांचा भव्य पुतळा अमरावती महानगरात उभारण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील असल्याचे दिलीप एडतकर यांनी सांगितले.

 

Web Title : Maharashtra Congress | insult of shivaji maharaj by ravi rana and bjp they should
immediately apologize congress dilip yedatkar demanded

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे हि वाचा