आपसात ‘भांडण्यापेक्षा’ लोकांची ‘कामे’ करा, काँग्रेस ‘हायकमांडचा’ राज्यातील नेत्यांना सज्जड ‘दम’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसची आज मुंबईमध्ये पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक दिल्लीतून आलेले मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत पार पडली. याबैठकीत मल्लिकार्जुन खरेग यांनी राज्यातील प्रमुख नेत्यांना काँग्रेसच्या विचारधारेचा अजेंडा राज्यात चालवताना आग्रहाने मांडा. अन्यथा हायकमांडच्या नाराजीला सामोरे जावे लागेल असा सज्जड दम दिला आहे. तसेच राज्यातील नेत्यांनी पक्षविरोधी पक्षांतर्गत कोणतेही विधान करू नये, पक्षाला त्याचा फटका बसणार नाही याची खबरदारी घ्यावी अशा कानपिचक्या देखील खरगे यांनी नेत्यांना दिल्याचे समजतेय.

राज्यातील महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या हक्काचे असलेले दलित, आदिवासी आणि अल्पसंख्यांकांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करा. त्यांचे प्रश्न प्रामुख्याने हातून त्याचे श्रेय कसे मिळेल याकडे आवर्जून पाहण्यासही खरगे यांनी राज्यातील नेत्यांना सांगितले. काँग्रेस वर्किंग कमिटीने जो अजेंडा देशाला अंमलबजावणीसाठी दिला आहे तो राज्यात कसा अवलंबला जाईल यासाठी आग्रही राहण्याचा सल्ला मल्लिकार्जुन खरगे यांनी या बैठकीत नेत्यांना दिला. या बैठकीमध्ये पुढील काळात नागरिकत्व सुधारणा कायद्यास विरोध करण्याबाबत समन्वय समितीत भूमिका मांडण्यास सांगण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबईतील टीळक भवन येथे राज्यातील प्रदेश कार्यकरणी आणि नवनियुक्त मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीला महाराष्ट्र प्रभारी मल्लीकार्जुन खरगे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्यासह अनेक नेते उपस्थीत होते.

फेसबुक पेज लाईक करा –