Maharashtra Congress | शिवसेना पाठोपाठ काँग्रेसमध्ये मोठी धुसफूस, तब्बल सात आमदारांवर कारवाई करण्याची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Congress | महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) अस्तित्वात होत त्यावेळी ते सरकार कोसळण्याच्या विविध चर्चा सुरुवातीपासूनच होत्या. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यांत काँग्रेस (Maharashtra Congress), शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी (NCP) यांच्यातील धुसफुसीच्या बातम्या समोर आल्या. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील सरकार कोसळण्यामागे महाविकास आघाडीतील धुसफुस हे मुख्य कारण आहे. शिवसेनेची झालेली फुट हे त्याचं उत्तम उदाहरण. विशेष म्हणजे शिवसेनेतील ही धुसफूस आणि फुट ताजी असताना काँग्रेसमध्ये धुसफूस असल्याचे समोर आले आहे.

 

शिवसेना पाठोपाठ आता काँग्रेसमध्ये (Maharashtra Congress) मोठी धुसफूस असल्याची चर्चा सुरु आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी या धुसफुसीवर बोट ठेवून कारवाईचा (Action) बडगा उचलण्याची मागणी केली आहे. 20 जूनला महाराष्ट्र विधान परिषदेच्या (Maharashtra Legislative Council) 10 जागांसाठी निवडणूक पार पडली. ही अतिशय अटीतटीची लढत होती. विशेष म्हणजे भाजपचे उमेदवार प्रसाद लाड (BJP Candidate Prasad Lad) आणि काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप (Bhai Jagtap) यांच्यात ही लढाई असल्याची चर्चा होती. पण निकाल वेगळाच लागला. काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांचा परभाव झाला. हा काँग्रेससाठी मोठा झटका होता. निकालानंतर काँग्रेसच्या सात आमदारांची मते फुटल्याची माहिती समोर आली होती. याच प्रकरणाला पृथ्वीराज चव्हाण यांनी गांभीर्याने घेतलं आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेत मोठी फूट पडल्याचं चित्र पहायला मिळालं.
त्यानंतर आता काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस समोर येताना दिसत आहेत.
विधान परिषद निवडणुकीत (Legislative Council Election) फुटलेल्या सात आमदारांवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी एच.के. पाटील (In-charge H.K. Patil) यांच्याकडे ही कारवईची मागणी केली आहे.
एका दलित उमेदवाराचा पराभव ही बाब गाभीर्याने घ्यायला हवी. याप्रकरणी चौकशी व्हायला हवी.
विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी अनेक आमदारांची सभागृहात अनुपस्थिती हे देखील योग्य नाही, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

 

Web Title :- Maharashtra Congress | maharashtra congress prithviraj chavan demanded action against seven split mlas in the maharashtra legislative council election

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Cabinet Expansion | शिंदे आणि फडणवीसांच्या सरकारमध्ये कुणाचा वरचष्मा? कोणत्या अपक्ष आमदारांना लागणार मंत्रीपदाची लॉटरी; जाणून घ्या

 

Gulabrao Patil | शिवसेना वाचवण्यासाठीच आम्ही मंत्रीपदे सोडली – गुलाबराव पाटील

 

Pune Crime | पेट्रोल व डिझेल चोरी करणारी टोळी गुन्हे शाखेकडून गजाआड, 81 लाखाचा मुद्देमाल जप्त