शिवसेनेचा खरा चेहरा समोर आला : अशोक चव्हाण

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आज भारत बंद आंदोलन करण्यात आले. या भारत बंद आंदोलनात एेनवेळी सहभागी न झालेल्या शिवसेनेचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे. अशी टीका काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी अशोक चव्हाण म्हणाले की, भारत बंद दरम्यान महाराष्ट्रात कुठेही हिंसक घटना घडल्या नाहीत. आंदोलनावर सरकारने दडपशाही करण्याचा प्रयत्न केला मात्र, जनतेकडून भारत बंदला उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला. इंधन दरवाढीसह इतर महागाईने देशभारात संतापाटी लाट पसरली आहे. इंधन दरवाढीच्या मुद्यावर सरकारने हात झटकले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरकार चालवण्यात अपयशी ठरले आहेत.

पुणे : स्टेट बँकेच्या एटीएमवर दरोड्याचा प्रयत्न, आरोपी अटकेत

काॅंग्रेससह भारत बंदला राष्ट्रवादी काॅंग्रेस, शेकाप, महाराष्ट्र नवनिर्मान सेना, स्वाभिमानी पार्टी अशा एकून 21 पक्षांनी पाठिंबा दिला. मात्र, एेनवेळी शिवसेनेने भारत बंदला पाठिंबा न देवून आपला खरा चेहरा दाखवला आहे. असे म्हणत चव्हान यांनी मोदी सरकारसह सिवसेनेचाही समाचार घेतला.

दाभोलकर हत्येच्या तपासावरुन न्यायालयाने सीबीआयला फटकारले

[amazon_link asins=’B0748NPV86,B0757K3MSX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f8e5e069-b4f2-11e8-b47c-4d554c241389′]

गणेशोत्सवात थर्माकॉल व्यावसायिकांचा ‘शिमगा’