Maharashtra Congress | ‘…तर काँग्रेस केवळ निवडणूक पोस्टरवरच उरेल’, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा कार्यकर्त्यांना इशारा

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Congress | निवडणूक (Election) ही संघटना मजबूत करण्याचे माध्यम आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने संघटना मजबुतीसाठी प्रयत्न करावे, लोकांना पक्षासोबत जोडावे तरच संघटना मजबूत होईल. पण, असे झाले नाही तर काँग्रेस पक्ष (Maharashtra Congress) केवळ निवडणुकीत येणाऱ्या पोस्टरमध्येच दिसेल, अशा शब्दांत काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार (Former Minister Sunil Kedar) यांनी कार्यकर्त्यांची कानउघडणी केली.

 

नागपूर शिक्षक मतदारसंघातील (Nagpur Teachers Constituency) महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले (Sudhakar Adbale) यांची प्रचार सभा जवाहर विद्यार्थीगृह येथे रविवारी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी केदार बोलत होते. ते म्हणाले, काँग्रेस पक्षाचे नेते संघटना कुठे आहे, असे विचारतात. संघटना काही दुकानातून विकत घेण्याची गोष्ट नाही. त्यासाठी सातत्याने विचार करावा लागतो. संधी मिळेल तेव्हा कृतीतून लोकांना जोडावे लागते. तेव्हा संघटना उभी राहते. मात्र, तसे केले नाही तर काँग्रेस (Maharashtra Congress) फक्त निवडणुकीतील पोस्टरमध्येच शिल्लक राहील असा इशारा त्यांनी दिला.

 

RSS कार्यकर्त्यांना पेन्शन, मग शिक्षकांना का नाही?
आणीबाणीच्या काळात मिसाबंदी कायद्याखाली अटक झालेल्या बहुतांश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्य़कर्त्यांना पेन्शन लागू करण्यात आली आहे.
त्यावरुन माजी मंत्री सुनील केदार यांनी सत्ताधारी भाजपला (BJP) लक्ष्य केलं. भाषणाच्या प्रारंभीच त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला.
शिक्षकांना जुनी पेन्शन दिल्यास आर्थिक गणित बिघडते, पण कायद्यात नसतानाही तुमच्या लोकांना पेन्शन देता,
तेव्हा आर्थिक गणित बिघडत नाही काय, असे सत्तेतील लोकांना विचारले पाहिजे, असे केदार म्हणाले.

 

Web Title :- Maharashtra Congress | then congress will remain only in poster sunil kedar warn congress workers campaign meeting of sudhakar adbale in nagpur

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Mrunal Thakur | अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या एथनिक लूकने चाहते घायाळ; फोटोवर होतोय कमेंटचा वर्षाव

Chandrashekhar Bawankule | ‘संताजी आणि धनाजी सारखे 18-18 तास काम करतात’; चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला

Maharashtra Politics | बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राच्या अनावरणाला उद्धव ठाकरे जाणार? आदित्य ठाकरे म्हणाले…