Maharashtra Corona | राज्यात जून, जुलैमध्ये कोरोनाची चौथी लाट?; आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Corona | मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या (Corona) महामारीने जगावर घाला घातला. या संकटात अनेकांचा प्राण गेला तर अनेकांची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली. सध्या राज्यात कोरोनाची (Maharashtra Corona) स्थिती आटोक्यात असली तरी कोरोना रुग्णसंख्या सध्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनाची चौथी लाट येणार का ? याबाबत चर्चा सुरू आहेत. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी मोठं विधान केलं आहे.

जालन्यात (Jalna) माध्यमांशी बोलताना राजेश टोपे (Rajesh Tope) म्हणाले, “जून, जुलैमध्ये कोरोनाची चौथी लाट जास्त जीवघेणी ठरत असल्याचे वाटले तर लसीकरणच तारणहार असणार आहे. लसीकरणाचे प्रमाण वाढवणे महाराष्ट्रासमोर महत्वाचे काम असणार आहे. आरोग्य विभाग याबाबतीत अत्यंत सजग आणि जागरुक राहून लसीकरणाचे काम करत आहे,” असं ते म्हणाले. (Maharashtra Corona)

”जून, जुलैमध्ये कोरोनाची चौथी लाट येऊ शकते,” असं राजेश टोपे म्हणाले आहेत. लसीकरणाचे प्रमाण वाढवणे हेच राज्यासमोरील आव्हान असल्याचं देखील राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून मुंबईतील (Mumbai) कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे.
मुंबईमधील बाधितांचे प्रमाण तर आता 2 टक्क्यांच्याही वर गेले आहे. त्यामुळे आता कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढणार का ?
अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी बहुतांश रुग्ण लक्षण विरहित आहेत.

Web Title : Maharashtra Corona | maharashtra health minister rajesh tope on fourth wave of covid

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा