Maharashtra Corona | पुण्यासह ‘या’ 7 जिल्ह्यांनी महाराष्ट्राची चिंता वाढवली, आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट राज्यापेक्षा अधिक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Corona | कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने महाराष्ट्रातील निर्बंध उठवण्याचा निर्णय राज्य शासनाने (State government) घेतला आहे. असं असतानाच देखील गेल्या काही दिवसापासून पुण्यासह (Pune) राज्यातील आणखी ७ जिल्ह्यांनी (7 districts) राज्याची (Maharashtra Corona) चिंता वाढवणारी बाब आहे. या जिल्ह्यांचा आठवड्याचा सकारात्मकता दर राज्याच्या पेक्षा अधिक आहेत. या जिल्ह्यात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, अहमदनगर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहेत. नव्या माहितीनुसार आता या 7 जिल्ह्यांचा कोरोना सकारात्मकता दर राज्याच्या सरासरीपेक्षा अधिक असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्याचा पॉझिटिव्हिटी रेट (Positivity rate) कमी होऊन 3.05 टक्के झालाय. 4 ते 10 ऑगस्ट या आठवड्यात पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट (Positivity rate) 5.81 टक्के इतका होता. तर, पूर्वीआठवड्यात पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट 6.38 टक्के होता. अहमदनगर जिल्ह्याचा 4 ते 10 ऑगस्ट या आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट 5.27 टक्के इतका होता. नगरचा पॉझिटिव्हिटी रेट 5.98 टक्के होता. पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या आठवड्याच्या पॉझिटिव्हिटी रेटमध्ये घट झालीय, परंतु,राज्याच्या सरासरी रेटपेक्षा अधिकच आहे.

सातारा आणि सांगली (Satara and Sangli) जिल्ह्याच्या आठवड्याच्या सक्रिय दर कमी होताना दिसला.
4 ते 10 ऑगस्ट या आठवड्यामध्ये सांगली 6.63 टक्के आणि सातारा 6.12 टक्के इतका होता.
तत्पूर्वी आठवड्यात त्यांचा पॉझिटिव्हिटी रेट (Positivity rate) अनुक्रमे 7.59 टक्के व 6.47 टक्के होता.
तसेच, सोलापूर 3.4 टक्के व बीड जिल्ह्याचा 4.24 टक्के होता. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, अहमदनगर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट (Positivity rate) राज्याच्या पॉझिटिव्हिटी रेटपेक्षा अधिक आहे. या दरम्यान, केंद्र सरकारने (Central Government) नुकतेच राज्यातील 37 जिल्ह्यात गेल्या २ आठवड्यात दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त केली होती. यात राज्यातील सोलापूर आणि बीड जिल्ह्यांचा समावेश आहे. अहमदनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांची दैनंदिन रुग्णवाढही अधिक होत असल्याचं राज्याच्या कोरोना आकडेवारीवरुन दिसत आहे.

या दरम्यान, कोरोनाबरोबर महाराष्ट्रात (Maharashtra) डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या (Delta Plus variant) रुग्णांची संख्या वाढली आहे. सध्या रुग्णांची संख्या 65 आहे.
बुधवारी आयजीआयबी प्रयोगशाळेने आणखी 20 डेल्टा प्लस रुग्णांची नोंद केली.
म्हणून, ही संख्या 65 वर पोहोचलीय.
रत्नागिरीतील एक मृत्यु वगळता डेल्टा प्लस रुग्णांमधील आजाराचे स्वरुप सौम्य ते मध्यम स्वरुपाचे असल्याची माहिती आरोग्य विभागाने (Department of Health) दिलीय.

Web Title :- Maharashtra Corona | pune among 7 districts with weekly covid positivity rate higher than state average

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Customs Department Pune Recruitment-2021 | पुणे सीमाशुल्क विभागात अनुभवी उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या सविस्तर

Anti Corruption Nashik | लाचखोर महिला शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकारांकडे कोटयावधीची संपत्ती, जाणून घ्या

Maharashtra Government | राज्यातील खासगी कार्यालये ‘या’ अटींवर 24 तास सुरु राहणार