Maharashtra Corona Restrictions | राज्यात ‘कोरोना’च्या रुग्णसंख्येत वाढ ! 2 दिवसांत निर्बंधाबाबत घेणार निर्णय; राजेश टोपेंची माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Corona Restrictions | राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची (Coronavirus in Maharashtra) संख्या नियंत्रणात आली असताना मागील सात दिवसांत रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. रुग्ण संख्येत हेणारी वाढ चिंताजनक असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी म्हटले आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची (Active Patient) संख्या देखील वाढत आहे. त्यामुळे आपल्याला आता अधिक काळजी घेण्याची आणि कदाचित निर्बंध (Maharashtra Corona Restrictions) अधिक कडक करण्याची गरज पडू शकते. यासंदर्भात येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यासोबत चर्चा करुन पुढील निर्णय घेतला जाईल, असे राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सांगितले. मुंबईत (Mumbai) झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

 

राज्यात मागील काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यापार्श्वभूमीवर राजेश टोपे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी टोप यांनी कोरोना रुग्णवाढीची आकडेवारीची माहिती देत राज्यात हळूहळू चिंताजनक वातावरण निर्माण होत असल्याची जाणीव करुन दिली. नागरिकांनी आता गाफील राहू नये. गेल्या सात दिवसांत रुग्णवाढीचा दर झपाट्याने वाढताना दिसत असल्याचे टोपे यांनी सांगितले.

मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट 4 टक्के
मुंबईत रुग्णांच्या पॉझिटिव्हिटी रेट (Positivity rate in Mumbai) आता 4 टक्क्यांवर गेला असून ही आकडेवारी चिंताजनक आहे. सध्या मुंबईत 1 हजाराच्या वर रुग्ण आढळून येत आहे. आज मुंबईत 1300 रुग्ण आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. आज संध्याकाळी संपूर्ण आकडेवारी आल्यानंतर हा आकडा अंदाजे 2200 वर जाईल, त्यामुळे ही अत्यंत चिंताजनक बाब असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.

 

दोन दिवसांत निर्बंधाबाबत निर्णय घेणार
राज्यातील कोरोना रुग्णवाढीची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून देणार आहे.
त्यानंतर सविस्तर चर्चा करुन निर्बंधामध्ये (Maharashtra Corona Restrictions) काही वाढ करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल.
सध्याची रुग्णवाढ पाहता निर्बंधांमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
नागरिकांनी आता सतर्क राहून जास्त गर्दी होईल अशा ठिकाणी जमणं टाळले पाहिजे.
लग्नसमारंभ किंवा इतर सोहळ्यांना गर्दी करु नये असे आवाहन राजेश टोपे यांनी केले.

 

 

Web Title :- Maharashtra Corona Restrictions | maharashtra corona updates number patients increasing two days decision will be taken on Restrictions in two days

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Police Recruitment | ‘महाराष्ट्र पोलीस दलात 50 हजार पदे भरणार’ – गृहमंत्री

Pune Crime | पुण्यात 29 वर्षीय महिलेचा विनयभंग ! डेक्कन पोलिस ठाण्यात वकिलावर गुन्हा दाखल

Pune Crime | ‘बहिणीच्या घरी नेऊन 16 वर्षाच्या मुलीवर अत्याचार’, अश्पाक बागवानला 10 वर्षे सक्तमजुरी; कोंढव्यात दाखल होता गुन्हा