Maharashtra Corona Restrictions | महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध आणि मास्क सक्ती ?; आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Corona Restrictions | कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्याने मागील महिन्यात महाराष्ट्र सरकारने (Maharashtra State Government) कोरोनावरील सर्व निर्बंध हटवले. त्याबरोबरच मास्कबाबत निर्णय घेताना सरकारने मास्क ऐच्छिक केले. मात्र आता भारतात पुन्हा कोरोनाचा विळखा वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून (Central Government) महाराष्ट्रासह 5 राज्यांना सावधानतेच्या सूचना दिल्या आहेत. यानंतर आता पुन्हा महाराष्ट्रात कोरोनाचे निर्बंध (Maharashtra Corona Restrictions) लागणार का ? मास्क सक्ती होणार का ? अशा चर्चा होत असतानाच यावर राज्याचे आरोग्यमंत्री (Maharashtra Health Minister) राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

 

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, ”महाराष्ट्रात तूर्तास नोंद घ्यावी अशी रुग्णसंख्या वाढलेली नाही. महाराष्ट्रात सध्या आढळणारी रुग्णसंख्येची गंभीर नोंद घ्यावी अशी नाही, त्यामुळे पुन्हा निर्बंध लावणं किंवा मास्कसक्तीचा कोणताही विचार नाही,” असं त्यांनी म्हटलं आहे. (Maharashtra Corona Restrictions)

 

पुढे बोलताना राजेश टोपे म्हणाले, ”मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतलेला आहे.
आरोग्य विभागातर्फे निरिक्षण केलं जात असून गरजेप्रमाणे पावले उचलली जात आहेत आणि सध्या तरी वेट अँड वॉचची भूमिका आहे.
घाई करण्याची कोणतीही गरज नसल्याचं ते म्हणाले.”

 

दरम्यान, सोमवारी महाराष्ट्रात 137 रुग्ण सापडले आहेत. राज्यात सध्या 660 सक्रिय रुग्ण आहेत.
यापैकी सर्वाधिक 390 रुग्ण मुंबईतले आहेत. तर ठाण्यात 49 सक्रिय रुग्ण आहेत. मागील 24 तासामध्ये 3 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
तर, राज्यातील 98.11 टक्के रुग्ण बरे होण्याचा दर आहे.

 

Web Title :- Maharashtra Corona Restrictions | Maharashtra Mumbai Corona Update Restrictions And Masks Enforced In The State Again See What The Health Minister Rajesh Tope Says


Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा