Maharashtra Corona | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 9,798 नवीन रुग्ण, 14,347 रुग्णांना डिस्चार्ज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनमहाराष्ट्रात कोरोनाचा (Maharashtra Corona) प्रादुर्भाव काही दिवसांपासून कमी होत असलेला दिसून येत आहे. कोरोनाचा रोजचा आकडा काही दिवसांपासून 10 हजारांच्या खाली आला आहे. आज 9,798 नवीन कोरोना बाधित रुग्णांची (new patient) नोंद झाली आहे. तर आज 14,347 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज (discharge patient) देण्यात आला आहे. त्यामुळे बरे होणाऱ्यांची (Recover patient) संख्या आता 56 लाख 99 हजार 983 इतकी झाली आहे. आज 198 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. Maharashtra State Coronavirus Update

राज्यात (Maharashtra Corona) सध्या 1 लाख 34 हजार 747 रुग्ण अॅक्टिव्ह (active) आहेत. त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राज्यातील (Maharashtra Corona) रुग्ण बरे होण्याचे प्रामाण (Recovery Rate) 95.73 टक्के एवढा झाला आहे. राज्यात आज 198 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.96 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 90 लाख 78 हजार 541 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी (Laboratory sample) 59 लाख 54 हजार 508 नमुने पॉझिटिव्ह (Positive) आले आहेत. सध्या राज्यात 8 लाख 54 हजार 461 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home quarantine) आहेत. तर 4 हजार 831 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (institutional quarantine) आहेत.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

पुण्यातील (Pune) कोरोनाची (Corona) आकडेवारी

– दिवसभरात 280 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 318 रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात कोरोना बाधित 19 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 12.
– 409 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 475377.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2658.
– एकूण मृत्यू -8516.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 464203.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 5951.

पिंपरी चिंचवडमधील कोरोनाची (Corona) आकडेवारी

– दिवसभरात 172 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 253 रुग्णांना डिस्चार्ज.
– शहरात कोरोनाबाधित 11 रुग्णांच्या मृत्यूची नोंद. गेल्या 24 तासात 03 जणांचा मृत्यू
– शहरात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 254910.
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 1195.
– एकूण मृत्यू – 4245.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 249470.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी – 5418.

पुणे जिल्ह्यातील रिकव्हरी रेट 97.30 रुग्ण

पुणे जिल्ह्यातील (Pune district) कोरोना बाधीत एकूण 10 लाख 36 हजार 335 रुग्णांपैकी 10 लाख 8 हजार 368 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण Active patient 10 हजार 540 आहे. कोरोनाबाधित एकूण 17 हजार 427 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.68 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण (Recovery rate) 97.30 टक्के आहे.

Wab Title :- Maharashtra State Coronavirus Update

हे देखील वाचा

Karnala Bank Scam | कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना ED कडून अटक

MP Chhatrapati Sambhaji Raje । संभाजीराजेंचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार; म्हणाले – ‘खासदारकी मागायला मी भाजपाकडे गेलो नव्हतो’

Vaccination Scam | मुंबईतील हाऊसिंग सोसायटीत बोगस लसीकरण; 390 जणांकडून घेतले प्रत्येकी 1260 रुपये

DSK Builder Case | 32 हजार ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक ! बिल्डर डीएसकेंचा मुलगा शिरीष कुलकर्णींचा जामीनासाठी अर्ज