Maharashtra Corona Vaccination | कोरोना लसीकरणात राज्याची पुन्हा थक्क करणारी कामगिरी, मिळवले ‘हे’ यश, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्राने सुरवातीपासून विक्रमी कामगिरी (Maharashtra Corona Vaccination) केली आहे. आज पुन्हा एकदा राज्याने कोरोनाविरूद्धच्या लढाईतील आपल्या कामगिरीने सर्वांना थक्के केले आहे. राज्यात 1 कोटीपेक्षा जास्त नागरिकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. एक कोटीपेक्षा जास्त नागरिकांना दोन्ही डोस देणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य (Maharashtra Corona Vaccination) ठरले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (chief minister uddhav thackeray) आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे (health minister rajesh tope) यांनी या यशाबद्दल आरोग्य विभागाचे विशेष अभिनंदन केले आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी 4 वाजेपर्यंत राज्यात दिवसभरात सुमारे पावणेचार लाख नागरिकांचे लसीकरण केले गेले. यानंतर दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 1 कोटी 64 हजार 308 इतकी झाली आहे.

लसीकरणाला सुरूवात झाल्यापासून महाराष्ट्र राज्याने लक्षवेधक कामगिरी करून दाखवली आहे.
राज्यात आतापर्यंत 3 कोटी 16 लाख 9 हजार 227 नागरिकांना लसीचा पहिला डोस दिला गेला आहे.
आजच्या सुमारे पावणेचार लाख नागरिकांच्या लसीकरणानंतर दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या एक कोटीच्या पुढे गेली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास (Additional Chief Secretary of the Health Department Dr. Pradeep Vyas) यांनी दिली.

व्यास यांनी म्हटले की, राज्यातील सुमारे 4 हजार 100 लसीकरण केंद्रवर आज सायंकाळी 4 वाजेपर्यंत 3 लाख 75 हजार 974 नागरिकांचे लसीकरण झाले.
सायंकाळी उशिरापर्यंत ही आकडेवारी आणखी वाढेल.

आदित्य ठाकरे यांच्याकडून कौतूक
कोरोना लसीकरणात राज्याने केलेल्या लक्षवेधक कामगिरीची दखल घेत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Environment Minister Aditya Thackeray) यांनी ट्विट करत आरोग्य विभागाचे कौतूक केले.
आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,
नैसर्गिक आपत्ती आलेली असतानाही राज्याने लसीकरणात विक्रमी कामगिरी करत 1 कोटी नागरिकांचे दोन्ही वेळचे लसीकरण पूर्ण केले.
यासाठी सर्व डॉक्टर्स (Doctors), नर्सेस (nurses), वैद्यकीय आणि अन्य अधिकार्‍यांचे (Medical Staff) अभिनंदन करतो.

Web Title :- Maharashtra Corona Vaccination | maharashtra first state to fully vaccinate over one crore people

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nashik Crime | दोघा भावांवर सपासप वार करत जीवघेणा हल्ला; नाशिक शहरातील खळबळजनक घटना, Video व्हायरल

Pune Crime | 58 गुंठे जमीन बळकवण्यासाठी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याच्या धमकीच्या गुन्ह्यातील संशयित नितीन हमनेचा जामीन मंजूर

Energy Policies | शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा, ‘हे’ 4 देश करतील जगाचा विध्वंस; महाविनाश रोखण्यासाठी घ्यावी लागेल ‘अ‍ॅक्शन’