महाराष्ट्रात ‘कोरोना’चा हाहाकार ! नागपुरात शाळा बंद पण VIP पार्ट्यांवर कारवाई कधी ?

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन  –  महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारसह अनेक जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे. नागपूरमध्येही कोरोनाचा उद्रेक होत आहेत. त्यामुळेच या भागातील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. मात्र, याच परिस्थितीत VIP पार्ट्या झाल्याचे समोर आले. मात्र, या पार्ट्यांवर कारवाई कधी, असा सवाल विचारला जात आहे.

महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्याचा सरकारकडून विचार सुरु आहे. राज्यात सातत्याने होणारा कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी नियमावली जारी करण्यात आली आहे. मात्र, त्या सर्व नियमावलींचे उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.

नाशिकमध्ये VIP पार्ट्या

नाशिकमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाचा लग्नसोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यामध्ये कोरोनाच्या सर्व नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात आले होते. इतकेच नाही तर राज्यातील अनेक नेतेमंडळींनी या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यामध्ये शरद पवार, देवेंद्र फडणवीस, संजय राऊत आणि अरविंद सावंत यांच्यासह अनेक नेतेमंडळींचा समावेश होता.

कोरोनाबाधित रुग्ण वाढताहेत

कोरोना व्हायरसचा संसर्ग महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात होत आहे. याची माहिती आकडेवारीत समोर आली आहे. महाराष्ट्रात सुमारे 7 हजार प्रकरणे समोर आली आहेत. तर यामध्ये 35 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात तिसऱ्या दिवशी एकूण 6 हजार रुग्णांचा आकडा पार झाला आहे.