सरकारच्या गलथान कारभारामुळे महाराष्ट्र कोरोनाच्या मृत्यू संख्येत जगात 10 व्या क्रमांकावर, भाजपची टीका (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या गलथान कारभारामुळे महाराष्ट्रात कोरोना बळींची संख्या लाखाच्या वर गेली आहे. कोरोना स्थिती हातळण्यात राज्यातील महाविकास आघाडी सरकरला सक्षम धोरण आखता आले नाही. त्यामुळे त्याची फळे राज्यातील जनतेला भोगावी लागली, अशी टीका भाजपचे (keshav Upadhye) प्रमुख प्रवक्ते केशव उपाध्ये (keshav Upadhye) यांनी केली. सोमवारी (दि.7) भाजप BJP प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मृत्यूसंख्येत महाराष्ट्र जगात 10 व्या क्रमांकावर

राज्याने कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येने नुकताच लाखांचा टप्पा पार केला आहे.

महाराष्ट्रापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यात मृत्यूची संख्या कितीतरी पटीने कमी आहे.

आघाडी सरकारला कोरोना प्रसारामुळे उद्भवलेली स्थिती योग्य तऱ्हेने हाताळता आली नाही.

त्यामुळे महाराष्ट्रात 1 लाखा पेक्षा अधिक मृत्यू झाले.

राज्य सरकारच्या या धोरण लकव्यामुळेच कोरोना मृत्यूच्या संख्येत महाराष्ट्र जगात 10 व्या क्रमांकावर असल्याचे उपाध्ये यांनी सांगितले.

प्रशासनाचा फटका सामान्यांना

मुख्यमंत्री आणि राज्य राज्य सरकारकडे लॉकडाऊन शिथील करण्याबाबत ठाम धोरण नसल्याने राज्यात सर्वत्र गोंधळ निर्माण झाला आहे.

कोणते निर्बंध उठवले, कोणते निर्बंध कायम केले आहेत, याची स्पष्टता राज्य सरकारकडून झाली नाही. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर गोंधळ निर्माण झाला आहे.

प्रशासनातील गोंधळाचा फटका सामान्य माणसाला बसतो आहे, अशी टीका उपाध्ये यांनी केली.

Also Read This : 

 

Pune Crime News | गुन्हे शाखेकडून कुविख्यात बापु नायरच्या टोळीतील सदस्याला अटक, गुन्हेगाराच्या अंत्ययात्रे दरम्यान काढली होती वाहनांची रॅली

 

शरीरातील ऑक्सिजन लेव्हल संतुलित ठेवण्यासाठी आहारामध्ये ‘या’ 5 गोष्टींचा करा समावेश; निश्चित होईल फायदा, जाणून घ्या

 

Coronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 206 नवीन रुग्ण, 123 जणांना डिस्चार्ज

 

पुस्तक वाचल्याने केवळ आपले ज्ञान वाढणार नाही तर आरोग्यासही होतील आश्चर्यकारक फायदे; जाणून घ्या

 

Coronavirus in Pune : दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तासात 514 रूग्ण ‘कोरोना’मुक्त, नवीन रुग्णांची संख्या दोनशेच्या आत

 

शरीरातील ऑक्सिजन लेव्हल संतुलित ठेवण्यासाठी आहारामध्ये ‘या’ 5 गोष्टींचा करा समावेश; निश्चित होईल फायदा, जाणून घ्या

 

Ration Card | तुमच्याकडे रेशन कार्ड नाही? मग करा घरबसल्या मोबाईलवरून ऑनलाईन रेशन कार्डसाठी अर्ज, जाणून घ्या प्रक्रिया