Coronavirus : राज्यात आज ‘कोरोना’चे 6 हजारांपेक्षा जास्त नवे पॉझिटिव्ह, मृत्यूच्या संख्येत घट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा ( Corona) प्रादुर्भाव वाढत आहे. आज राज्यात कोरोनाचे ६ हजारहुन जास्त रुग्ण सापडले आहेत. मात्र दिलासा म्हणजे कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये ( death) घट झाली आहे. महाराष्ट्रात आज 4 हजार 89 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत 16 लाख 72 हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.48 टक्के इतके झाले आहे. आज राज्यात 6 हजार 185 नवीन रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

कोरोनाबाबत राज्यात नक्की कशी आहे स्थिती ?
राज्यात आज 85 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.
सध्या राज्यातील मृत्यूदर 2.59 टक्के इतका आहे
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 35 लाखाहून अधिक प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 18 लाख 8 हजार 550 म्हणजेच 17 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात 5 लाखांहून अधिक व्यक्ती होम क्वारन्टाईनमध्ये आहेत तर 7 हजाराहून अधिक व्यक्ती संस्थात्मक क्वारन्टाईन मध्ये आहेत.
राज्यात एकूण 87 हजार 969 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

यादरम्यान दिवाळीमध्ये (Diwali) मुंबई, ( mumbai ) पुणे ( Pune) यांच्यासह ग्रामीण भागातही कोरोनाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला आहे. दिवाळीच्या काळात अनेक नागरिकांनी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास केला तसेच ते खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडले त्यामुळे खूप ठिकाणी गर्दी पाहायला मिळाली होती. त्यामुळे आता राज्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडू लागले आहेत. यापुढे नागरिकांनी आपली खबरदारी घेण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात येत आहे.

You might also like