Coronavirus : 29 राज्यांमध्ये ‘कोरोना’चे 33000 अ‍ॅक्टीव्ह रूग्ण, एकटया मुंबईत 35000 संक्रमित

मुंबई : कोरोना व्हायरसने देशाची आर्थिक राजधानी मुंबईत हाहाकार उडवला आहे. महाराष्ट्रात 60 टक्केपेक्षा जास्त केस मुंबईत आहेत. एवढेच नव्हे, 29 राज्यांत जेवढे एकुण रूग्ण आहेत, त्याच्या जास्त रूग्ण एकट्या मुंबईत आहेत. संक्रमित रूग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. प्रत्येक दिवशी हजारो नवीन केस समोर येत आहेत.

मुंबई 35 हजारच्या पुढे

मुंबईत गुरुवारी कोरोना व्हायरस संसर्गाची 1438 नवी प्रकरणे समोर आल्यानंतर महानगरात संसर्गाचा आकडा 35 हजारच्या पुढे गेला आहे. तर आणखी 38 लोकांचा मृत्यू झाल्याने एकुण मृतांची संख्या 1100 पेक्षा जास्त झाली आहे. बृहन्मुंबई महानगर पालिकेनुसार (बीएमसी) मागील 24 तासात मुंबईत 1438 नव्या कोरोना रूग्णांसह एकुण संक्रमित लोकांची संख्या 35,273 झाली आहे. बीएमसीने सांगितले की, मुंबईत कोविड-19 मुळे आणखी 38 रूग्णांच्या मृत्यूसह मृतांची एकुण संख्या 1135 झाली आहे.

महाराष्ट्रातील 60% केस मुंबईत

महाराष्ट्रात गुरुवारी कोरोना व्हायरसच्या 2598 केस समोर आल्या, ज्यानंतर राज्यात संक्रमित रूग्णांची संख्या वाढून 59,546 झाली आहे. एकट्या मुंबईत रूग्णांची एकुण संख्या 35,273 आहे. म्हणजे 60 टक्केपेक्षा जास्त. महाराष्ट्रात रिकव्हरी रेट 31.36 टक्के आहे. तर मृत्यूदर 3.32 टक्के आहे. महाराष्ट्रात मागील 24 तासात झालेल्या 85 मृत्यूंपैकी 38 मुंबईतील आहेत.

29 राज्यांत मुंबई पुढे

अनेक आकडे भितीदायक आहेत. 29 राज्यात एकुण 33 हजार 92 रूग्ण आहेत. तर एकट्या मुंबईत 35 हजारपेक्षा जास्त केसेस आहेत, तर देशाच्या 30 राज्यांत एकुण 1 हजार 87 मृत्यू झाले आहेत. यापैकी मुंबईत 1135 लोकांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत 382% वाढ

देशात मागील 27 दिवसात 371 टक्के कोरोना रूग्णांची वाढ झाली आहे. मुंबईत मे महिन्यातील कोरोनाचा वेग देशाच्या तुलनेत 10% जास्त होता. 30 एप्रिलपर्यंत मुंबईमध्ये रूग्णांचा आकड़ा 7061 होता. तर, 27 मे पर्यंत 34 हजार 18 प्रकरणे झाली. म्हणजे रूग्णांच्या संख्येत 382 टक्के वाढ झाली.