Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 6738 नवे पॉझिटिव्ह तर 91 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोनाचा प्रसार हळूहळू कमी होताना दिसत आहे. आज राज्यात कोरोना संसर्गित रुग्णांपेक्षा कोरोनातुन मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या जास्त असल्याचे समोर आले आहे. दिवसभरात ८ हजार ४३० रुग्णांना उपचारानंतर रुग्णालयातून सोडून देण्यात आले आहे. तर महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८९.५३ टक्के झाले आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यात १० हजारांपेक्षा कमी कोरोना संसर्गित रुग्णांची नोंद करण्यात येत आहे. आज दिवसभरात राज्यात ६ हजार ७३८ नव्या बाधित रुग्णांची वाढ झाली असून, ९१ रुग्णांचा जीव गेला आहे. राज्यातील एकूण कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या आता १६ लाख ६० हजार ७६६ वर गेली आहे. त्यात १४ लाख ८६ हजार ९२६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या १ लाख २९ हजार ७४६ रुग्णांवर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

राज्यात आजवर तपासण्यात आलेल्या ८७ लाख ६८ हजार ८८९ चाचण्यांपैकी १६ लाख ६० हजार ७६६ चाचण्यांचा अहवाल सकारात्मक आला आहे. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण १८.९४ टक्के आहे. आताच्या घडीला राज्यात २५ लाख २८ हजार ५४४ जण घरगुती विलगीकरणात आहेत. तर १२ हजार ९८८ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like