Coronavirus : दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 26 हजारांपेक्षा जास्त रुग्ण झाले ‘कोरोना’मुक्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात रविवारी कोरोना रुग्ण बरे होण्याचा विक्रम झाला आहे. दिवसभरात तब्बल 26 हजार 408 रुग्णांना आज घरी सोडण्यात आले आहे. सलग चौथ्या दिवशी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक झालं आहे. मागील 8 दिवसात बरे झालेल्या रुग्णाची टक्केवारी 70 वरुन 73.17 टक्क्यावर गेली आहे. आतापर्यंत 8 लाख 84 हजार 384 रुग्ण बरे झाले आहेत.

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असताना नवीन कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येने 12 लाखांचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासात 20 हजार 598 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 12 लाख 8 हजार 642 इतकी झाली आहे. राज्यात रुग्ण कोरोनाचे रुग्ण वाढत असताना मृत्यूचे प्रमाण देखील वाढत आहे. गेल्या 24 तासात राज्यात 455 रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यात आतापर्यंत 31 हजार 671 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 2 लाख 91 हजार 238 रुग्ण अॅक्टिव्ह असून त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच काही दिलासादयक आकडेवारीही समोर आली आहे. दिवसभरात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांनी उच्चांक गाठला आहे. गेल्या 24 तासात देशामध्ये तब्बल 94 हजार 612 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची देशातील संख्या ही 43 लाख झाली आहे. तर देशाचा रिकव्हरी रेट 79.68 टक्के एवढा झाला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like