Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 7863 नवे रुग्ण, 6332 जणांना डिस्चार्ज

मुंबई : पोलीसानामा ऑनलाइन – राज्यात कोरोनानं पुन्हा एकदा हातपाय पसरवण्यास सुरुवात केल्यानं आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यात गेल्या 24 तासात 7 हजार 863 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

आज राज्यात 54 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 52 हजार 238 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील सध्याचा मृत्यू दर 2.41 टक्के इतका आहे. तर आज दिवसभरात 6 हजार 332 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत 20 लाख 36 हजार 790 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.89 टक्के इतके झाले आहे.

सध्या राज्यात 79 हजार 093 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 64 लाख 21 हजार 879 प्रयोगशाळा नमुन्यापैकी 21 लाख 69 हजार 330 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 13.22 टक्के इतके आहे.